For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विस्थापित कुकी लोकांना करणार मदत

07:00 AM Nov 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
विस्थापित कुकी लोकांना करणार मदत
Advertisement

वृत्तसंस्था/डिफू

Advertisement

मणिपूरमध्ये दीर्घकाळापासून कुकी-जो आणि मैतेई समुदायादरम्यान हिंसा होत आहे. या हिंसेत आतापर्यंत अनेक लोकांना जीव गमवावा लागला आहे. याचदरम्यान आसाममधील कार्बी आंगलोंग स्वायत्त परिषदेने (केएएसी) सुमारे 1 हजार कुकी-जो लोकांना वापसीसाठी मदत करणार असल्याची घोषणा केली आहे. हे कुकी लोक मागील वर्षी मणिपूरमध्ये हिंसा भडकल्यावर आश्रयासाठी सिंघासोन पर्वतीय क्षेत्रांमध्ये पोहोचले होते. आसामच्या हद्दीत आलेल्या कुकी-जो लोकांची वापसी सुविधानजक करण्यासाठी विविध घटकांसोबत बैठकांचे आयोजन करणार असल्याचे केएएसीचे मुख्य कार्यकारी सदस्य तुलीराम रोंगहांग यांनी सांगितले. आम्ही बळजबरीने कुकी- जो लोकांना बेदखल करणार नाही, तर कुकी समुदायासमवेत विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांसोबत विचारविनिमय केल्यावर त्यांच्या वापसीची सुविधा प्रदान करणार आहोत, असे रोंगहांग यांनी म्हटले आहे.

कार्बी आंगलोंग जिल्ह्याच्या स्थापनेपासून राहत असलेल्या किंवा दीर्घ काळापासून स्थायी रहिवासी असलेल्या लोकांनाच भूमी अधिकार दिला जाईल. जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या व्यक्ती विशेषकरून मणिपूरमध्ये येणाऱ्या लोकांना भूमी दस्तऐवज वितरित करण्याच्या आमच्या पुढाकाराच्या अंतर्गत भूमी अधिकार दिले जाणार नाहीत. याप्रकरणी चर्चेसाठी गुरुवारी बैठक बोलाविण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. कार्बी आंगलोंग आणि पश्चिम कार्बी आंगलोंग जिल्ह्यांचे शासन घटनेतील सहाव्या अनुसूची अंतर्गत स्वायत्त परिषदेकडून केले जाते. हे दोन्ही जिल्हे कार्बी समुदायबहुल आहेत. भूतकाळात कार्बी आणि कुकी समुदायादरम्यान मोठा संघर्ष झाला आहे. कार्बी उग्रवादी संघटनांनी 2021 मध्ये सरकारसोबत शांतता करारावर स्वाक्षरी केल्याने हिंसा समाप्त झाली होती. कार्बी आणि कुकी यांच्यातील संघर्षाचे कारण भूमी, साधनसंपत्ती आणि राजकीय प्रतिनिधित्वाचा वाद ठरला होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.