कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

म्हादई पात्राच्या पाहणीची मागणी करणार : शिरोडकर

12:37 PM Apr 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : म्हादई नदीच्या पाणी वाटपासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘प्रवाह’ प्राधिकरणाची बैठक आज मंगळवार दि. 22 एप्रिल रोजी बेंगळुरु कर्नाटक येथे सकाळी 11 वा. होणार आहे. कळसा -भांडुरासह म्हादईच्या संपूर्ण पात्राची संयुक्त पाहणी करण्याची मागणी गोवा सरकारतर्फे त्या बैठकीत केली जाणार अशी माहिती जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली आहे. शिरोडकर म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘प्रवाह’ची स्थापना करण्यात आली असून ही चौथी बैठक आहे. त्यासाठी खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी, अधीक्षक अभियंता दिलीप नाईक, जलस्रोत खाते सचिव एम. गील हे बेंगळुरुकडे रवाना झाले आहेत. म्हादई पाणी वाटपाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. ‘प्रवाह’ समोर गोव्याची बाजू मांडण्यासाठी सर्व तपशील तयार करण्यात आला असून म्हादईचे संपूर्ण पात्र तपासावे या मागणीवर बैठकीत भर देण्यात येणार असल्याचे शिरोडकर यांनी स्पष्ट केले. म्हादईवर लहान धरण प्रकल्प उभारण्याचे प्रस्ताव असून ते बैठकीत मांडले जातील आणि त्यावर मान्यता घेण्यात येणार आहे. विर्डी येथे म्हादई नदीवर धरण बांधण्याचा महाराष्ट्राचा प्रस्ताव आहे, त्यावरही चर्चा होणार आहे. विर्डी धरणाला गोवा सरकार पाठिंबा देणार की नाही यावरही तेथे विचारमंथन होईल. ‘प्रवाह’साठी गोव्यात कायमस्वरुपी कार्यालयाची मागणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article