वंचित घटकांना समाजाच्या प्रवाहात आणणार : आमदार घोरपडे
उंब्रज :
उंब्रज (ता. कराड) येथे आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या उपस्थितीत भटके विमुक्त दिन साजरा करण्यात आला. यावेळी भटके विमुक्त समाजातील २२ कुटुंबांना शिधापत्रिकेचे वितरण करण्यात आले. आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या प्रयत्नातून कराड उत्तरमध्ये प्रथम भटके विमुक्त समाजातील लोकांना मोफत शिधा वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास कराडच्या तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे, पुरवठा अधिकारी श्रीमती नायकवडी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव जाधव, बाळासाहेब साळुंखे चोरेकर, महेशबाबा जाधव, उंब्रजचे सरपंच योगराज जाधव यांची उपस्थिती होती.
आमदार मनोजदादा घोरपडे म्हणाले "कराड उत्तर मध्ये भटक्या विमुक्त जमातीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून हा समाज आजही मागासलेले जीवन जगत आहे. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. आजपर्यंत तांडावस्तीसाठी जवळपास चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. येणाऱ्या काळात सर्व तांडा वस्तीची सुधारणा करण्यात येईल. भटक्या विमुक्त समाजातील लोकांना अन्नधान्य उपलब्ध करुन देण्यासाठी शिधापत्रिका उपलब्ध करून देणार आहे. तसेच कोर्टी येथील गोपाळ समाजासाठी हायवेपासून चांगला रस्ता व अंतर्गत सुविधा देण्यासाठी प्रस्ताव केला असून लवकरच त्याची अंमलबजावणी होईल."
"ज्या भटक्या विमुक्त समाज बांधवांकडे जातीचे दाखले नाहीत, त्या सर्वांना नवीन जातीचे दाखले उपलब्ध करून देणार."
यावेळी जयवंत जाधव (चेअरमन), जयवंत जाधव (संचालक), विनायक जाधव, दिगंबर भिसे पाटील, विलास आटोळे, राजू चव्हाण, बाळासाहेब शिंदे सरकार, सुनिल जाधव, अनिल माने, योगराज सरकाळे, प्रतिभा कांबळे व मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.