For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बिडेन यांना द्यावी लागणार डिमेंशिया टेस्ट?

06:27 AM Feb 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
बिडेन यांना द्यावी लागणार डिमेंशिया टेस्ट
Advertisement

ऊंट, सिंह, गेंडा ओळखावा लागणार : स्मरणशक्तीबद्दल अनेकांकडून संशय व्यक्त

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्या स्मरणशक्तीवरून वाद वाढत चालल आहे. स्वत: बिडेन यांनी स्मरणशक्तीविषयक आरोप फेटाळण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आहे. यादरम्यान गाझाविषयक प्रश्नावर त्यांना हमासचे नावच आठवले नाही. यानंतर इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतह अल-सिसी यांना बिडेन यांनी मेक्सिकोचे अध्यक्ष ठरविले.

Advertisement

काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या एका क्लासिफाइड दस्तऐवजात बिडेन यांना ‘चांगला हेतू असणारा परंतु कमजोर स्मरणशक्ती असणारा वृद्ध’ संबोधिण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आता अमेरिकेत बिडेन यांच्या डिमेंशिया टेस्टची मागणी जोर पकडू लागली आहे. माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता अनेक तज्ञांनी हे परीक्षण करविण्याची मागणी केली आहे.

ट्रम्प यांचीही डिमेंशिया टेस्ट

डिमेंशिया टेस्ट दिल्यावर बिडेन हे या महत्त्वपूर्ण पदावर कायम राहण्यासाठी स्वत:ला मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त सिद्ध करू शकतील असे तज्ञांचे म्हणणे आहे. यापूर्वी ट्रम्प 2018 मध्ये या गोल्ड स्टँडर्ड डिमेंशिया टेस्टला सामोरे गेले होते.

अनेक प्रकारच्या चाचण्या

1996 मध्ये पहिल्यांदा कॅनडात सुरू झालेले मॉन्ट्रियल कॉग्निटिव्ह असेसमेंट (एमओसीए) पूर्ण जगात डिमेंशियाचे निदान करण्यासाठी सर्वात विश्वासार्ह चाचणी ठरली होती. ही एकाग्रता, ध्यान, स्मरणशक्ती, भाषा, एक्झिक्यूटिव्ह फंक्शन आणि व्हिज्युअल स्कीलचे आकलन करते. 10 मिनिटांच्या या चाचणीत ऊंट, सिंह आणि गेंड्यासारख्या प्राण्यांनाही ओळखण्यास सांगण्यात येते. याचबरोबर घड्याळ तयार करणे, 1 ते 5 पर्यंत अंक आणि ए पासून ई पर्यंतची अक्षरे वाचण्यास सांगितले जाते. अशाप्रकारच्या आणखी अनेक चाचण्या होत असतात. यात 26 पेक्षा अधिक गुणांना सामान्य मानले जाते. ट्रम्प यांना या चाचणीत 30 गुण मिळाले होते.

62 टक्के अमेरिकन चिंतेत

फेब्रुवारी 2022 मध्ये व्हाइट हाउसचे माजी चिकित्सक प्रतिनिधी रोनी जॅक्सन समवेत 37 खासदारांनी औपचारिक पत्र लिहून बिडेन यांनी कॉग्नेटिव्ह टेस्टला सामोरे जावे अशी मागणी केली होती. अध्यक्ष बिडेन यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरून 62 टक्के अमेरिकन नागरिक चिंतेत असल्याचे एका सर्वेक्षणात दिसून आले आहे.

युवा नेतृत्वाची मागणी

अमेरिकेच्या वर्तमान अध्यक्षांचे वय 81 वर्षे आहे. तर आगामी निवडणुकीतील मजबूत दावेदार ठरलेले ट्रम्प हे 77 वर्षांचे आहेत. ट्रम्प निवडणुकीत विजयी झाल्यास पुढील 4 वर्षांमध्ये त्यांच्या प्रकृतीवरून चिंता सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर देशात आता युवा नेतृत्वाची मागणी जोर पकडू लागली आहे.

Advertisement
Tags :

.