For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ओसाका, वावरिंका,थिएम,अॅन्डेस्क्यु यांना वाईल्डकार्ड

06:28 AM Aug 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
ओसाका  वावरिंका थिएम अॅन्डेस्क्यु यांना वाईल्डकार्ड
Advertisement

वृत्तसंस्था/न्युयॉर्क

Advertisement

26 ऑगस्टपासून येथे सुरू होणाऱ्या 2024 च्या टेनिस हंगामातील शेवटच्या अमेरिकन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेत जपानची नाओमी ओसाका, स्वीसचा वावरिंका, ऑस्ट्रियाचा थिएम आणि कॅनडाचा अॅन्डेस्क्यु यांना आयोजकांनी वॉईल्डकार्डव्दारे प्रवेश दिला आहे.

जपानच्या नाओमी ओसाकाने आतापर्यंत 4 ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा जिंकल्या असून त्यापैकी पहिली ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा 2018 साली येथे जिंकली होती. 2020 साली तिने पुन्हा दुसऱ्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते. 2024 च्या टेनिस हंगामामध्ये ओसाकाने डब्ल्युटीए टूरवरील स्पर्धांमध्ये आपली उपस्थिती पुरेशी दर्शविली नाही तसेच ती  प्रमुख ड्रॉसाठी थेटपात्र होण्याकरिता महिला टेनिसपटूंच्या मानांकनात पुरेसे गुण नोंदवू शकली नाही. ओसाकाने दोनवेळा ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा जिंकली आहे. सध्या सुरू असलेल्या सिनसीनॅटी टेनिस स्पर्धेत ओसाकाला उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला.

Advertisement

कॅनडाची महिला टेनिसपटू अॅन्ड्रेस्क्युला 2024 च्या टेनिस हंगामात वारंवार दुखापतीमुळे चांगलेच दमविले. ती या हंगामात जवळपास 9 महिने विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकली नाही. 2019 साली या स्पर्धेत अॅन्ड्रेस्क्युने अमेरिकेच्या सेरेना विलीयम्सचा पराभव करत विजेतेपद पटकाविले होते.

ऑस्ट्रियाचा 30 वर्षीय टेनिसपटू थिएम याला अमेरिकन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत यावेळी वाईल्डकार्डव्दारे प्रवेश देण्यात आला आहे. थिएमचा हा शेवटचा टेनिस हंगाम आहे. या स्पर्धेनंतर तो कदाचित निवृत्तीची घोषणा करण्याचे संकेत मिळाले आहेत. 2020 साली थिएमने अमेरिकन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा जिंकली होती. स्वीसच्या 39 वर्षीय वावरिंकाला यावेळी अमेरिकन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा आयोजकांनी वाईल्डकार्डव्दारे प्रवेश दिला आहे. त्याने आतापर्यंत तीन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा जिंकल्या असून त्यापैकी 2016 साली अमेरिकन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते. 26 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत अमेरिकेच्या अमंदा अॅनिसिमोव्हा, केस्लर, नोएल, जोव्हिक या महिला टेनिसपटूंनाही वाईल्डकार्ड मिळाले आहे.

Advertisement
Tags :

.