जगातील सर्वात रुंद नदी
जगातील सर्वात नदी कोणती या प्रश्नावर बहुतांश लोक नाईल हे नाव घेतील. तर सर्वात छोटी नदी म्हणून नॉर्थ मोंटानातील रोए नदीचा उल्लेख केला जातो. परंतु जगातील सर्वात रुंद नदी कोणती याचे उत्तर बहुतेकांना माहित नसावे. काही जण अमेझॉनला जगातील सर्वात रुंद नदी ठरवतात. परंतु यावरून वाद आहे. अमेरिकन देश उरुग्वे आणि अर्जेंटीना स्वत:च्या सागरी किनाऱ्यानजीक वाहणाऱ्या रियो डे ला प्लाटाला जगातील सर्वात रुंद नदी मानतात, याचा शोध 1516 मध्ये स्पेनचा रहिवासी जुआन डियाज डे सोलिसने लावला होता.
परंतु भूगोलतज्ञांनुसार रियो डी ला प्लाटा प्रत्यक्षात एक नदी नाही, तर एक नदीचे मुख आहे. जेथे उरुग्वे आणि पराना नदी सामावते. तर दुसरीकडे अर्जेंटीना आणि उरुग्वेमध्ये याला सर्वसाधारणपणे नदी मानले जाते. याची सुरवात दोन छोट्या नद्यांच्या संगमातून होते. याचा आकार रुंद असून ही अटलांटिकमध्sय सामावते. जे लोक याला एक नदी मानतात, त्यांच्यासाठी ही जगातील सर्वात रुंद नदी आहे, याची कमाल रुंदी सुमारे 20 किलोमीटर इतकी आहे.
स्पेनचा खलाशी जुआन अटलांटिक आणि प्रशांत महासागरादरम्यान मार्ग शोधत होता, त्याचदरम्यान त्याने या नदीचा शोध लावला होता. जुआनने याच्या विशाल आकारामुळे याला ‘गोड्या पाण्याचा समुद्र’ संबोधिले होते. अनेक लोक याला चांदीची नदीही म्हणतात. येथे चांदीचा अनमोल भांडार असल्याचे बोलले जाते. हा भांडार शोधण्याचा प्रयत्न अनेक लोकांनी केला आहे. परंतु कधीच याची पुष्टी होऊ शकलेली नाही. रियो डी ला प्लाटाच्या किनाऱ्यांवर अर्जेंटीना आणि उरुग्वे या देशांमधील सर्वात अधिक लोकसंख्या असलेल्या क्षेत्रांचा समावेश आहे.
याच नदीच्या काठावर अर्जेंटीनाची राजधानी ब्यूनॉस आयर्स आहे. उरुग्वेची राजधानी आणि याचे सर्वात मोठे शहर मोंटेवीडियो देखील रियो डी ला प्लाटाच्या काठावर आहे. परंतु भूगोलतज्ञ याला वारंवार नदीचे मुख ठरवतात.