Solapur : सोलापुरात हॉटेलसाठी घरगुती गॅस सिलिंडरचा सर्रास वापर
घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला, शासनाच्या महसुलाला Only
चाकूर : तालुक्यातील अनेक गावांमध्ये तसेच चाकूर शहरातही छोट्या-मोठ्या हॉटेलमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा सर्रास वापर होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शासनाने घरगुती गॅस सिलिंडर हे केवळ स्वयंपाकासाठी घरांमध्ये वापरण्याची परवानगी दिली असतानाही व्यावसायिक वापरासाठी हेच सिलिंडर मोठ्या प्रमाणावर बापरले जात आहेत. यामुळे शासनाच्या महसुलाला फटका बसत असून सुरक्षा धोकाही बाढत आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील चहाची टपरी, छोटे खानावळ व्यवसाय, नाश्त्याचे स्टॉल, भेळ-भजी विक्रेते तसेच काही मोठी हॉटेलसुद्धा घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करताना दिसतात. व्यावसायिक वापरासाठी नियमानुसार 'कॉमर्शियल गॅस सिलिंडर' आवश्यक असतो. मात्र हा सिलिंडर महाग असल्याने अनेक व्यावसायिक खर्च टाळण्यासाठी घरगुती गॅसवरच चालवतात.
या अनधिकृत वापरामुळे शासनाला जीएसटी व अन्य महसूलात होत आहे. नुकसान तसेच घरगुती गॅसची रचना व्यावसायिक दाबासाठी नसल्याने आग लागण्याचा धोका योग्य शासनाच्या महसुलाला फटका बाढतो. काही ठिकाणी सिलिंडर घटनाही फुटण्याच्या घडल्या आहेत.
गॅस वितरण कंपन्यांनी अशा प्रकारच्या अनधिकृत बापरावर लक्ष ठेवून कारवाई करण्याची जबाबदारी असली तरी त्याकडे अनेकदा दुर्लक्ष होत आहे. स्थानिक प्रशासन आणि खाद्य व औषध प्रशासन विभागाने संयुक्त मोहीम राबवून या प्रकारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
स्थानिक समाजसेवकांनी सांगितले की, हॉटेलमध्ये घरगुती गॅस सिलिंडर वापरणे म्हणजे थेट शासनाची फसवणूक आहे. त्यामुळे अशा सर्व ठिकाणांची तपासणी करून दोषींवर दंडात्मक कारवाई व्हावी. दरम्यान, काही हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले की, कमर्शियल सिलिंडर महाग असल्याने त्यांचा वापर केल्यास खर्च वाढतो.
त्यामुळे लहान व्यवसाय टिकवण्यासाठीच घरगुती सिलिंडर वापरावा लागतो. मात्र, कोणत्याही परिस्थितीत हा नियमभंग योग्य ठरत नाही. प्रशासनाने तत्काळ सर्व हॉटेल, टपरी आणि खानावळींची तपासणी करून अनधिकृत गॅस वापर करणाऱ्यांबवर गुन्हा दाखल कराबा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.