कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गुडघ्यावर बसूनच का करतात प्रपोज?

06:28 AM Apr 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तुम्हाला माहिती आहे का कारण

Advertisement

दरवर्षी व्हॅलेंटाइन डे जगभरात साजरा केला जात असल्याचे आपण पाहतो. या दिवशी प्रियकर-प्रेयसी स्वत:च्या प्रेमाला व्यक्त करत असतात. परंतु प्रपोज करण्यासाठी कुठलाच खास असा दिवस नसतो. ज्याच्यावर प्रेम केले जाते, त्याला हे कधीही सांगता येते आणि जर नाते मजबूत झाले असेल तर विवाहासाठी देखील मागणी घातली जाऊ शकते. परंतु प्रेमाला व्यक्त करण्याशी संबंधित एक अत्यंत रंजक बाब आहे. अखेर एका गुडघ्यावर बसूनच का प्रपोज केले जाते याचा विचार कधी केला आहे का?

Advertisement

गुडघ्यांवर बसणे प्राचीन काळात सन्मान देण्याचे प्रतीक असायचे. पूर्वी एका गुडघ्यावर केवळ देवासमोर बसले जायचे. परंतु पर्शियत साम्राज्यात या प्रथेची सुरुवात झाली होती असे मानले जाते. सामाजिक आणि प्रशासकीय रचनेत वरिष्ठ असलेल्या व्यक्तींसमोर लोक एका गुडघ्यावर बसून सन्मान द्यायचे. अलेक्झांडरने पर्शियन साम्राज्यावर कब्जा केला, तेव्हा त्याच्या राज्यात देखील या प्रथेला अवलंबिण्यात आले, या प्रथेला प्रोसकायनेसिस म्हटले जायचे.

राजा-राणीसमोर गुडघ्यांवर बसायचे योद्धा

गुडघ्यावर बसण्याच्या प्रथेला नाइट्सद्वारे प्रेमाशी जोडण्यात आले. नाइट्स कुठल्याही राज्यात महान काम करणारे लोक असायचे किंवा असे सैनिक जे घोड्यांवरून युद्ध लढत होते. 11 व्या शतकाच्या आसपास नाइट्स स्वत:च्या साम्राज्याच्या दरबारात वरिष्ठ पदांवर आरुढ महिलांवर प्रेम करू लागले होते, हे प्रेम दर्शविण्यासाठी हे नाइट्स ज्याप्रकारे राजा किंवा राणीसमोर एका गुडघ्यावर बसायचे, त्याचप्रकारे स्वत:च्या प्रेयसींसमोर बसून त्यांना सुरक्षित ठेवण्याचे वचन देत होते.

प्राचीन चित्रं पाहून शिकली पद्धत

त्या काळातील अनेक चित्रांमध्ये चित्रकारांनी नाइट्सला किंवा अन्य पुरुषांना महिलांसमोर एका गुडघ्यावर बसलेले दाखविले आहे. येथूनच गुडघ्यावंर बसणे प्रेमाचे प्रतीक ठरले आणि लोक प्रेम व्यक्त करण्यासाठी स्वत:च्या प्रेयसीसमोर एका गुडघ्यावर बसू लागले. अशाप्रकारे ते तिच्याबद्दल सन्मान दाखवू लागले. हळूहळू हे प्रेमाचे प्रतीक ठरले.

Advertisement
Tags :
#social media#tarunbharat_official#tarunbharatnews
Next Article