महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चेंगराचेंगरीच्या घटना का घडतात?

06:29 AM Jul 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

धार्मिक आयोजनांमध्येच सर्वाधिक प्रमाण, चेंगराचेंगरीत महिला ठरतात अधिक शिकार

Advertisement

उत्तर प्रदेशच्या हाथरसच्या सिकंदराराऊमध्ये बाबा नारायण साकार हरि भोलांच्या एका सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत 123 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महिलांचे प्रमाण अधिक आहे. आमच्या देशात अनेकदा धार्मिक आयोजनामध्ये चेंगराचेंगरी होत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होत असते. अखेर चेंगराचेंगरीच्या घटना का घडतात आणि यामागे कोणती कारणे असतात तसेच प्रामुख्याने महिलाच याच्या शिकार का ठरतात हे प्रश्न यामुळे उपस्थित होतात.

Advertisement

- 2015 मध्ये आंध्रप्रदेशच्या गोदावरी पुष्करममध्ये धार्मिक स्नान उत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत किमान 29 जणांचा मृत्यू झाला. भाविक नदीच्या दिशेने धावताना खाली कोसळले आणि स्वत:ची पादत्राणे हातात घेत असताना हा प्रकार घडला होता.

- 2014 मध्ये मुंबईत झालेल्या चेंगराचेंगरीत 18 जण मृत्युमुखी पडले. दाऊदी बोहरा समुदायाच्या अध्यात्मिक नेत्याला अंतिम श्रद्धांजली वाहण्यासाठी लोक एकत्र आले असताना हा प्रकार घडला. परिसरातील गल्ल्या अत्यंत अरुंद होत्या, तर तेथे प्रचंड गर्दी झाली होती असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

- मध्यप्रदेशच्या रतनगढ माता मंदिरानजीक एक पूल कोसळल्याची अफवा पसरल्यावर झालेल्या चेंगराचेंगरीत 110 भाविकांचा मृत्यू झाला होता. हा प्रकार नवरात्रीदरम्यान घडला होता.

- 2013 साली अलाहाबाद कुंभदरम्यान रेल्वेची प्रतीक्षा करणारे भाविक रेल्वेस्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत बळी पडले. या घटनेत 35 जणांचा मृत्यू झाला होता.

14 फेब्रुवारी 1954 रोजी प्रयागराजमध्ये प्रयाग कुंभदरम्यान चेंगराचेंगरी होत 500 जणांचा मृत्यू झाला होता.

 

80 टक्के चेंगराचेंगरीच्या घटना धार्मिक सभांमध्ये

एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार 2000 पासून 2013 पर्यंत चेंगराचेंगरीच्या घटनांमध्ये सुमारे 2 हजार लोक मृत्युमुखी पडले. इंटरनॅशनल जर्नल ऑफ डिझास्टर रिस्क रिडक्शनकडून (आयजेडीआरआर) प्रकाशित 2013 च्या एका अध्ययनातून भारतात 79 टक्के चेंगराचेंगरीच्या घटना धार्मिक सभा आणि भाविकांमुळे घडतात असे समोर आले. भारत आणि अन्य विकसनशील देशांमध्ये गर्दीशी निगडित बहुतांश दुर्घटना धार्मिक स्थळीच घडल्या आहेत.

धार्मिक आयोजनांमध्ये चेंगराचेंगरी का?

धार्मिक आयोजन हे प्रामुख्याने बाहेर पडण्यासाठी केवळ एकच मार्ग असलेल्या ठिकाणी होत असते. हा मार्ग देखील अत्यंत अरुंद असतो. बहुतांश धार्मिक उत्सव नद्यांच्या काठी, पर्वतीय भाग किंवा पर्वत शिखर यासारख्या क्षेत्रांमध्ये साजरे केले जातात. या क्षेत्रांवर जाण्यासाठी प्रशस्त मार्ग नसतो, यामुळे भाविकांसाठी जोखीम निर्माण होते.

 

चेंगराचेंगरीमागे अनेक कारणे...

- क्षमतेपेक्षा अधिक गर्दी

- जमावाचे खराब नियंत्रण

- चुकीचे कार्यक्रमस्थळ,

- मार्गांची अनुपलब्धता

- अरुंद, चिंचोळे स्थान

- धोकादायक संरचना

व्यवस्थापनातील त्रुटी

सर्वसाधारणपणे धार्मिक सभा आणि आयोजनांना लोकांना बाहेर पडण्यासाठी योग्य व्यवस्था असेल तरच मंजुरी मिळते. अनेक एक्झिट मार्ग असावेत आणि प्रत्येक मार्ग मोठा आणि रुंद असणे आवश्यक असते. सर्वसाधारणपणे धार्मिक आयोजनांचे आयोजक आयोजनस्थळाचे मालक आणि राज्य प्रशासनाला जमावाच्या सुरक्षेसाठी जबाबदार मानतात. योग्य गर्दी व्यवस्थापन प्रणालीच्या अभावामुळे अशा आपत्ती घडत असल्याचे तज्ञांचे सांगणे आहे.

गर्दीनुसार आयोजनस्थळ मोठे असावे

भारतात धार्मिक आयोजनांमध्ये सर्वसाधारणपणे मोठी गर्दी होते. सर्वसाधारणपणे प्रतिचौरस मीटर क्षेत्रात कमाल 5 पेक्षा अधिक लोक असू नयेत. परंतु आमच्या देशात होणाऱ्या आयोजनांमध्ये प्रतिचौरस मीटर क्षेत्रात लोकांची संख्या 10 पर्यंत पोहोचते. हाथरस येथील आयोजनात केवळ एकच एक्झिट मार्ग होता आणि तो देखील अरुंद होता. अमेरिकेत एका चौरस मीटरमध्ये 5 हून अधिक लोकांना समायोजित करता येत नाही. परंतु भारतात हा प्रकार सर्रासपणे घडतो. गर्दी वाढू लागल्यावर स्थितीवर नियंत्रण मिळविणे अवघड ठरते.

दुर्घटनेची सुरुवात कशाप्रकारे

चेंगराचेंगरीच्या प्रकरणांमध्ये प्रामुख्याने ट्रिगर सायकोलॉजी कारणीभूत असते. म्हणजेच गर्दीत अफवा पसरणे, मोठा आवाज किंवा एखादा व्यक्ती घसरून पडणे, पूर्वीच अरुंद असलेल्या जागेत घाबरलेल्या लोकांनी परस्परांना धक्का देणे सुरू करणे या घटना ट्रिगर करणाऱ्या ठरू शकतात. मूलभूत सुविधांच्या अभावामुळे गर्दीचे वर्तन आणखी बिघडत जाते आणि धोक्याची भावना वाढते असे इंडियन सोसायटी फॉर अप्लाइड बिहेवियरल सायन्सचे अध्यक्ष गणेश अनंतरामन यांनी सांगितले. घबराटीच्या स्थितींमध्ये प्रत्येकाच्या मेंदूत एखादा धोका असल्याचा अलार्म वाजतो. बहुतांश लोकांना धोका खरोखरच आहे की नाही आणि तो आपल्याला प्रभावित करणार का हेच बहुतांश लोकांना माहित नसते. प्रत्येकजण स्वत: आणि स्वत:च्या परिवाराविषयी चिंतेत असल्याने स्वार्थी होतो, उर्वरित लोकांना तो केवळ एक वस्तू आणि अडथळ्याच्या रुपात पाहू लागतो असे दिल्लीतील विद्यासागर इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ, न्यूरो अँड एलाइड सायन्सेसचे माजी क्लीनिकल सायकोलॉजिस्ट डॉ. पुलकित शर्मा यांनी सांगितले.

पोलिसांनी कारवाई केल्यास...

अनियंत्रित लोकांच्या एका समुहाला रोखत पोलीस अनेकदा समोरून येणाऱ्या गर्दीला विरुद्ध दिशेने पिटाळून लावण्याचा प्रयत्न करतात. यामुळे संघर्ष होण्याची शक्यता वाढते.

महिलांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक

हाथरस दुर्घटनेतील मृतांमध्ये महिलांचे प्रमाण अधिक आहे. बहुतांश घटनांमध्ये असेच घडते. धार्मिक आयोजनांमध्ये महिला सहभागी होण्याचे प्रमाण तुलनेत अधिक असते. चेंगराचेंगरीच्या घटनेवेळी स्वत:ला तसेच मुलांना सांभाळण्याचे दिव्य त्यांना पार पाडावे लागते. मृत्यूचे सर्वात सामान्य कारण कंप्रेसिव्ह एस्फिक्सिया आहे, जे अशा सिथतीत महिलांसाठी धोकादायक स्वरुपात वाढते.

शरीराची प्रतिक्रिया

चेंगराचेंगरीदरम्यान गर्दीत सापडलेले लोक परस्परांना धडकतात. याचा अर्थ हलण्यासाठी कुठलीच जागा नसते. हे श्वसनासाठी जबाबदार एक प्रमुख स्नायू डायाफ्रमाला आकुंचित आणि सपाट होण्यापासून रोखते. याचा अर्थ हवा फुफ्फुसांमध्ये प्रवेश करू शकत नाही किंवा बाहेर पडू शकत नाही. हे घडल्यावर लवकरच कार्बन डायऑक्साइडची निर्मिती आणि ऑक्सिजनच्या कमतरतेसोबत कंप्रेसिव्ह एस्फिक्सियाच्या दिशेने माणूस जातो. मानवी शरीर दीर्घकाळापर्यंत ऑक्सिजनशिवाय काम करू शकत नाही. कारण यामुळे लवकरच अवयव निकामी होत मेंदू मृत होऊ शकतो.

चेंगराचेंगरीच्या घटना कशा टाळाल?

धार्मिक स्थळ, रेल्वेस्थानक, क्रीडा-सामाजिक-राजकीय आयोजनांसमेत सामूहिक सोहळ्यांच्या ठिकाणी वारंवार होणारी चेंगराचेगरी आता मोठ्या चिंतेचा विषय ठरली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानुसार (एनडीएमए) लोकसंख्या विस्फोट, शहरीकरण, धार्मिक सोहळे मॉल इत्यादींमध्ये मोठ्या संख्येत लोक आल्याने अशा घटनांमध्ये वृद्धी होण्याची भीती आहे. एनडीएमएने सार्वजनिक ठिकाणी गर्दी आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी ‘भीड प्रबंधन’ नावाने दस्तऐवज सादर करत काही दिशानिर्देश जारी केले आहेत. गर्दीमुळे होणाऱ्या आपत्ती या सर्वसाधारणपणे मानवनिर्मित्त आपत्ती असतात, या आपत्तींना उत्तमप्रकारे प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून सक्रीय योजनेद्वारे पूर्णपणे रोखता येऊ शकते. या दिशानिर्देशांचा उद्देश सामूहिक सोहळ्यांच्या ठिकाणी प्रभावी गर्दी व्यवस्थापनासाठी आयोजक, प्रशासक आणि अन्य घटकांना मार्गदर्शन करणे आहे.

विशाल सभांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण असते. गर्दी एका क्षणात चेंगराचेंगरीचे रुप धारण करू शकते आणि यामुळे जीवितहानी होऊ शकते. गर्दी अफवांना बळी पडत झुंडसारखी मानसिकता धारण करू शकतो. जमाव भडकल्यावर लोकांच्या या अस्थिर गर्दीला नियंत्रित करणे अत्यंत अवघड असते. याचमुळे मंडप आणि सोहळ्यांच्या आयोजकांनी सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी खबरदारी बाळगणे आवश्यक आहे.

कुठली पावले उचलावीत?

मंडप आणि कार्यक्रमस्थळांच्या मैदानांनजीक वाहतूक नियंत्रित करणे पहिले पाऊल असल्याचे आपत्ती व्यवस्थापन संस्थेने म्हटले आहे. पायी चालणाऱ्या लोकांसाठी कार्यक्रमस्थळाच्या मार्गाचा नकाशा झळकविण्यात यावा. तसेच कार्यक्रमस्थळातून बाहेर पडण्याचे मार्ग दाखविले जावेत. वाढत्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी रांगेत असलेल्या लोकांची ये-जा सुनिश्चित करण्यासाठी बॅरिकेडिंग करणे महत्त्वपूर्ण आहे.

आयोजकांनी गर्दीवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत तसेच झटापट आणि अन्य छोट्या-मोठ्या भांडणांची जोखीम कमी करण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी. एनडीएमएनुसार अनधिकृत पार्किंग आणि पायी चालणाऱ्या लोकांसाठीच्या जागेवर कब्जा करणाऱ्या तात्पुरत्या स्टॉल्सवर देखील लक्ष देण्याची गरज आहे.

वैद्यकीय संबंधी आपत्कालीन स्थिती कार्यक्रमस्थळी उद्भवू शकते. आपत्कालीन स्थितीत रुग्णवाहिका आणि आरोग्यतज्ञ लोकांचा जीव वाचवू शकतात. मौजमजा करणाऱ्या लोकांना बाहेर पडणाऱ्या मार्गांची माहिती देणे, शांत राहणे आणि निर्देशांचे पालन करणे चेंगराचेंगरीसारखी स्थिती रोखण्यास मदत करू शकते.

चेंगराचेंगरी झाल्यास काय करावे?

चेंगराचेंगरी झाली तर स्वत:च्या हातांना बॉक्सरपणे ठेवून स्वत:च्या छातीला सुरक्षित करावे आणि गर्दीच्या दिशेने पुढे सरकत रहावे. मोकळ्या जागांबद्दल सतर्क रहावे आणि जेथे गर्दी कमी असेल तेथे जाण्याचा प्रयत्न करावा. भिंती, बॅरिकेड्स किंवा दरवाजे इत्यादी अडथळ्यांपासून दूर रहावे. स्वत:च्या पायांवर उभे रहावे, जर खाली पडत असाल तर लवकर उठून उभे रहावे. या प्रक्रियेत जखमी झाल्यास आणि उठता येत नसल्यास स्वत:चे डोकं झाकण्यासाठी हातांचा वापर करावा आणि उलट्या दिशेने वळावे, यामुळे जोखीम कमी होऊ शकते. मंडपांमध्ये अनियोजित आणि अधिकृत वीजेची वायर, खाण्यापिण्याच्या दुकानांवर एलपीजी सिलिंडर असल्याने आग लागण्याचा धोका असतो. आसपासची मोठी गर्दी पाहता या घटना जीवघेण्या ठरू शकतात.

- संकलन : उमाकांत कुलकर्णी

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article