महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

काही लोक ‘लेफ्टी’ का असतात?

06:42 AM Apr 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

काय आहे डाव्या हाताने काम करण्याचे शास्त्राrय कारण?

Advertisement

जगातील  90 टक्के लोक कामांसाठी उजव्या हाताचा वापर करतात. केवळ 10 टक्क्यांच्या आसपास लोकच लेफ्टी असतात. म्हणजेच ते डाव्या हाताने बहुतांश कामे करतात. यासंबंधीचे कारण जाणून घेण्यासाठी वैज्ञानिक प्रयत्नशील होते. आता हे लोक लेफ्ट हँडेड का असतात याचा खुलासा झाला आहे.

Advertisement

प्रत्यक्षात याची सर्व कहाणी त्यांच्या गुणसुत्रांशी निगडित आहे. अशा लोकांच्या शरीरात एक खास प्रकारचे दुर्लभ गुणसुत्र असते, जे त्यांच्या शरीरात पेशींच्या आकाराला नियंत्रित करते, म्हणजेच डाव्या हाताने काम करणाऱ्या लोकांच्या शरीरात हे गुणसुत्र 2.7 पट अधिक प्रमाणात आढळून येते. या गुणसुत्राचे नाव टीयुबीबी4बी आहे. हे गुणसुत्र मेंदूची सिमिट्री म्हणजेच संतुलनाला नियंत्रित करतो.

आश्चर्याची बाब म्हणजे हे गुणसुत्र डाव्या हाताने काम करणाऱ्या लोकांच्या शरीरात केवळ 0.1 टक्के आहे. केवळ इतकेच गुणसुत्र यांच्या पूर्ण जीवनशैलीला बदलून टाकतो. हे जगाला दुसऱ्या प्रकारे पाहतात, डाव्या हाताने काम करतात, डावा हातच त्यांचा सर्वात शक्तिशाली अवयव ठरत असतो.

नेदरलँडच्या मॅक्स प्लँक इन्स्टीट्यूट फॉर सायकोलिंग्विस्टिकचे क्लाइड फ्रँक्स यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. सर्वसाधारणपणे लोकांच्या मेंदूचे दोन हिस्से अनेक प्रकारच्या कामांचे निर्धारण करतात. अवयवांच्या वेगवेगळ्या कामांना निश्चित करतात. शरीराच्या दोन हिस्स्यांमध्ये किरकोळ फरक असतो. मेंदूचा डावा हिस्सा भाषेला नियंत्रित करतो. तर उजवा हिस्सा दृष्टी नियंत्रित करत असतो.

यासंबंधीचे अध्ययन अलिकडेच नेचर कम्युनिकेशन्समध्ये प्रकाशित झाले आहे. बहुतांश लोकांच्या मेंदूचा डावा हिस्सा शरीराच्या उजव्या हिस्स्याला नियंत्रित करतो. कारण त्यांचे नर्व फायबर डाव्या बाजूकडून उजव्या दिशेने जातात. परुंत डाव्या हाताने काम करणाऱ्या लोकांच्या मेंदूचा उजवा हिस्सा शरीराच्या डाव्या अवयवांना नियंत्रित करतो.

टीयुबीबी4बी गुणसुत्र एका खास प्रकारच्या प्रोटीनला नियंत्रित करतो. हे प्रोटीन पेशींमधील मायक्रोट्यूब्युल्सच्या फिलामेंटशी जोडला जातो. यामुळे पेशींचा आकार नियंत्रित होतो. हेच गुणसुत्र त्यांना डाव्या हाताने काम करण्यासाठी उपयुक्त ठरवते. त्याचप्रकारे मेंदू कार्यान्वित करण्यासाठी मदत करतो. हे अध्ययन करण्यासाठी ब्रिटनमध्ये 3.50 लाख लोकांचा मेंदू आणि गुणसुत्राचे अध्ययन करण्यात आले. यातील 11 टक्के  लोक डाव्या हाताने काम करणारे होते. भ्रूणात जेव्हा मेंदू विकसित होतो, तेव्हा हे गुणसुत्र कुठे असते आणि कुठून येते याचा अदय्पा शोध लागलेला नाही. कशाप्रकारे भ्रूणाला लेफ्ट किंवा राइट हँड साइड काम करणारे करते हे देखील स्पष्ट झालेले नाही.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article