महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

घाऊक महागाई दराचा नऊ महिन्यांचा उच्चांक

06:46 AM Jan 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

देशातील घाऊक महागाईने नोव्हेंबरमध्ये 0.26 टक्क्मयांच्या तुलनेत डिसेंबरमध्ये वार्षिक आधारावर 0.73 टक्क्मयांच्या नऊ महिन्यांतील उच्चांक गाठला. सलग सात महिने ऋणात्मक राहिल्यानंतर नोव्हेंबरमध्ये घाऊक चलनवाढ आता वाढताना  दिसत आहे. प्राथमिक वस्तूंची घाऊक महागाई (अन्नपदार्थ, खनिजे आणि भाजीपाला) डिसेंबर महिन्यात वाढून 5.78 टक्के झाली आहे. हा दर नोव्हेंबर महिन्यातील 4.76 टक्के होता.

Advertisement

डिसेंबरमध्ये खाद्यपदार्थांच्या वाढीमुळे, घाऊक अन्न निर्देशांकावर आधारित चलनवाढीचा दर नोव्हेंबर 2023 मध्ये 4.69 टक्क्मयांवरून 5.39 टक्क्मयांवर पोहोचला. खाद्यपदार्थांच्या महागाईचा दर डिसेंबरमध्ये 9.38 टक्क्यांपर्यंत वाढला. हा दर नोव्हेंबरमध्ये 8.18 टक्के होता. डिसेंबरमध्ये भाज्यांच्या महागाईचा दर 26.30 टक्के होता, तर डाळींचा महागाई दर 19.60 टक्के नोंद झाला आहे. दरम्यान, इंधन, ऊर्जा आणि उत्पादन क्षेत्रातील महागाई अनुक्रमे उणे 2.41 टक्के आणि उणे 0.71 टक्के आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article