For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इमर्जन्सी चित्रपटाचा शुक्रवारचा मुहूर्त हुकला! कंगना रणौतला मोठा झटका

01:55 PM Sep 05, 2024 IST | Abhijeet Khandekar
इमर्जन्सी चित्रपटाचा शुक्रवारचा मुहूर्त हुकला  कंगना रणौतला मोठा झटका
Advertisement

सर्टिफिकेट देण्याचा सेन्सॉर बोर्डाला आदेश देण्यास हायकोर्टाचा नकार

Advertisement

लोकसभा खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत हिची मुख्य भूमिका असलेल्या इमर्जन्सी चित्रपटाला सेन्सॉर सर्टिफिकेट न मिळाल्याने शुक्रवारचा मुहूर्त पुन्हा हुकला आहे. न्यायामूर्ती बी पी कोलाबावाला आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठाने सर्टिफिकेट देण्याबाबत सेन्सॉर बोर्डाला थेट आदेश देता येणार नाहीत असे स्पष्ट करत याचिकेची सुनावणी 19 सप्टेंबरला निश्चित केली.

अभिनेत्री कंगणा रणौतच्या इमर्जन्सी चित्रपटाच्या रिलीज डेट आणि सेन्सॉर प्रमाणपत्रासाठी झी एन्टरटेन्मेटने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.या याचिकेवर न्यायामूर्ती बी पी कोलाबावाला आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठा समोर सुनावणी झाली.

Advertisement

खंडपीठाने याचिकेची गंभीर दखल घेतली. सेन्सॉर बोर्डाने सुचविलेले कट्सचा विचारात धेऊन निर्मात्यांनी पुन्हा नव्याने सादरीकरण करावे .त्यावर सेन्सॉर बोर्डाने गणपतीचे कारण न देता त्यावर 18 सप्टेंबरपर्यंत योग्य तो निर्णय घ्यावा असे निर्देश देत याचिकेची सुनाणी 19 सप्टेंबरला निश्चित केली.

Advertisement
Tags :

.