येथे जो गेला, तो परतलाच नाही
इटलीतील अत्यंत रहस्यमय बेट
जगात अनेक रहस्यमय बेटं असून त्यातील एक बेट इटलीत आहे. या बेटाचे नाव पोवेग्लिया असून त्याविषयी अनेक रहस्यं आहेत. या बेटावर जो कुणी जातो, तो कधीच जिवंत परतत नाही.
पोवेग्लिया बेटाचा इतिहास अत्यंत दु:खद राहिला आहे. 14 व्या शतकात प्लेगची साथ फैलावली असता या बेटाला प्लेगने ग्रस्त लोकांचे विलीगीकरण करण्यासाठी वापरण्यात आले होते. लाखो लोकांना येथे आणून जिवंत जाळण्यात आले होते. याचमुळे या बेटाला ‘प्लेग आयलँड’ देखील म्हटले जाते.
प्लेग महामारीनंतर हे बेट अनेक वर्षांपर्यंत रिकामी सोडण्यात आले होते. 19 व्या शतकात येथे एक मनोरुग्णांसाठी रुग्णालय सुरू करण्यात आले होते. या रुग्णालयात रुग्णांसोबत अत्यंत वाईट वर्तणूक केली जात होती. त्यांना यातना देण्यात येत होत्या आणि अनेकदा तर त्यांना जिवंतच दफन पेले जात होते. या बेटावर प्लेगने मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे आणि मनोरुग्णांचे आत्मे भटकत असतात असे बोलले जाते. या बेटावर जाणाऱ्या लोकांनी अजब अन् विचित्र घटना घडत असल्याचे सांगितले आहे. अचानक तापमानात बदल होणे, आवाज ऐकू ये आणि काळोखात कुणाचे तरी सावट जाणवणे असे प्रकार घडत असल्याचे त्यांचे सांगणे आहे.
या बेटावर जाणारे अनेक लोक आजारी पडतात किंवा त्यांच अचानक मृत्यू होतो. या बेटाशी संबंधित भीतीदायक कहाण्यांनी लोकांच्या मनात भीती निर्माण केली आहे. या बेटावर जाण्यास सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे. या बेटावर जाऊन येणारा इसम आजारी पडतो किंवा कुठल्या न कुठल्या कारणाने त्याचा अचानक मृत्यू होत असतो.