महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कोल्हापुरातून मंत्री कोण होणार ?

04:12 PM Nov 24, 2024 IST | Radhika Patil
Who will be the minister from Kolhapur?
Advertisement

नजरा मुंबईकडे ; किमान तीन मंत्रीपदाची आस
कोल्हापूर

Advertisement

कोल्हापुरातील विधानसभेच्या दहा पैकी थेट नऊ जागा महायुतीच्या पारड्यात पडल्या. चंदगडची एक जागाही महायुतीची मानली जाते. यापार्श्वभूमीवर कोल्हापुरात मंत्री कोण-कोण होणार याची चर्चा रंगली आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार विनय कोरे, आमदार राजेश क्षीसागर, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यापैकी कोण मंत्री होणार हे पाहणे उत्सुकतेचं ठरेल.

Advertisement

कोल्हापूर जिह्याने महायुतीला भरभरुन मतदान केले. शिवसेनेचे प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरके आणि राजेश क्षीरसागर हे तिन उमेदवार निवडून आले. तर महायुतीने पाठींबा दिलेले अपक्ष राजेंद्र पाटील यड्रावकर आणि हातकणंगलेची जनसुराज्य शक्तीचे नुतन आमदार अशोकराव माने या दोन जागा शिंदे गटाच्या कोट्यातून दिल्या होत्या. तर भाजपने कोल्हापूर दक्षिण अमल महाडिक आणि इचलकरंजीतून राहुल आवाडे यांना उमेदवारी देवून निवडून आणले. शाहुवाडी पन्हाळायाची जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे यांची जागा भाजपच्या कोट्यातून जाहीर झाली होती. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ यांनी कागलची जागा जिंकली तर चंदगडमधून राजेश पाटील पराभूत झाले. चंदगडमधून अपक्ष शिवाजी पाटील निवडून आले असले तरी मागील 2019ची निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढवली होती.

विधानसभा निवडणुकीचा राज्याचा कल स्पष्टपणे महायुतीला मिळाला आहे. कोल्हापुरात निवडणुकीचा प्रचार करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आबिटकर यांना तिस्रयांदा निवडून द्या, त्यांना मंत्री करतो असे जाहीर केले होते. तर मुख्यमंत्री शिंदे यांचे राजेश क्षीरसागर हे अत्यंत निकटवर्ती मानले जातात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नेहमीच साथ देणारे आमदार विनय कोरे यांनी जिह्यातून दोन जागा निवडून आणल्या आहेत. त्यामुळे विनय कोरे हे मंत्रीपदाचे दावेदार मानले जातात. यासह मुख्यमंत्री अजित पवार यांचे एकमेव उमेदवार असल्याने हसन मुश्रीफ हेही मंत्रीपदाचे दावेदार मानले जातात. महायुतीच्या तीन पक्षांच्या कोट्यातून कोल्हापूरला किमान तीन मंत्रीपद मिळतील असे संकेत आहेत. हे तीन कोण असणार ? हे लवकरच स्पष्ट होईल.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article