विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानीस जबाबदार कोण ?
बाल शिक्षण पाया बेभरोसे
कसबा बीड येथील अंगणवाडी क्रमांक 18, अंगणवाडी सेविका विना सुरू.
कसबा बीड-विश्वनाथ मोरे
विद्यार्थ्यांना बाल हक्क व शिक्षण सक्तीचे मिळालेच पाहिजे यासाठी शासन स्तरावर अनेक योजना व पर्याय राबवले जातात.यासाठी लागणारा फंड हा दिला जातो. विद्यार्थ्यांना वेळेत शिक्षण मिळावे, त्यांचा पाया भक्कम व्हावा व देशाचा नागरिक सदृढ व शैक्षणिक व बौद्धिक आदि क्षेत्रामध्ये प्रगल्भ व्हावा यासाठी शासन अग्रेसर आहे .यासाठी अपवाद कसबा बीड येथील अंगणवाडी क्रमांक 18 ही गेली अनेक दिवस बेभरोशावर सुरू आहे.येथे विद्यार्थी येतात पण शिक्षण देणारी अंगणवाडी सेविकाच नाही ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे लहान वयातच विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे.मुले लहान असल्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या नियंत्रणाखाली अंगणवाडी चालवली जाते.मदतनीस आहे पणअंगणवाडी सेविका नाही पर्यायी मुलांना शिक्षण नाही,त्यांना लागणाऱ्या सवयी व त्यांचे शिक्षण हे वेजबाबदारपणे सुरू आहे असे पालकांचे म्हणणे आहे.या परिस्थितीमध्ये संपूर्ण पालक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
कसबा बीड येथे एकूण 8 मुलांसाठी व 8 मुलीसाठी प्रभागाप्रमाणे एकूण 16 अंगणवाडी आहेत.यापैकी अंगणवाडी क्रमांक 18 येथील अंगणवाडी सेविका सौ साधना भाऊसो देसाई या मेडिकल रजेवरती असल्यामुळे त्या अंगणवाडीमध्ये येऊ शकत नाही.अंगणवाडी सेविकाच नसल्यामुळे अंगणवाडी पर्यवेक्षक यांना फोन केला तर त्या फोन घेत नाहीत,त्यामुळे याची लेखी तक्रार ग्रामपंचायत सरपंच यांच्याकडे केली आहे.तसेच पालक आले म्हणून सरपंच यांनी सुद्धा सुपरवायझर यांना फोन केला असता त्यांनी कोणाचाही फोन उचलला नाही.म्हणजेच कुंपणाने शेत खाल्ले... जाब कोणाला विचारायचा ... या म्हणीप्रमाणे अंगणवाडी सेविकांचे सुपरवायझरच जाग्यावर नाहीत कोणाचाही फोन घेत नाही,अंगणवाडी सेविका रजेवरती आहेत .
तसेच आजारी अंगणवाडी सेविकां यांनी रजेवर असलेले त्यांचे लेखी पत्र सुद्धा त्यांनी ऑफिसला दिलेले आहे .पण अजूनही या अंगणवाडीमध्ये शिक्षण सेविका मिळत नाही ? मुलांना शिक्षण मिळत नाही ? मुलांच्या होणारी नुकसानी जबाबदार कोण ? या प्रश्नाचे उत्तर देणार कोण ? असे अनेक विविध प्रश्न व प्रशासनाच्या आंधळेपणाचे लक्षण आहे असे म्हटले तरी वावगे होणार नाही .
माझा नातू अंगणवाडी क्रमांक १८ मध्ये शिकत असून गेले अनेक दिवस या अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेविका नाही.त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.यासाठी सुपरवायझर यांना फोन केला असता त्या फोन घेत नाही.नवीन अंगणवाडी सेविका मिळत नाही त्यामुळे आम्ही आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.
श्री.आनंदा शंकर पाटील पालक कसबा बीड
माझा मुलगा या अंगणवाडीमध्ये शिकत असून येथे अंगणवाडी सेविका नसल्यामुळे मला अंगणवाडी मध्ये येऊन बसावे लागत आहे .मुलांना शिक्षण नाही तसेच अंगणवाडीत येऊन बसल्यामुळे घरातील इतर कामे खळंबलेली आहेत.त्यामुळे मुलाचे शिक्षण की घरचे काम अशी दुहेरी भूमिका पार पाडावी लागत आहे .
सौ.अपूर्वा विजय मांगोरे, कसबा बीड, पालक
आजारी अंगणवाडी सेविकेचा रजेचा अर्ज मिळाला असून पर्यायी अंगणवाडी सेविकेची नेमणूक केलेली आहे.तसेच संबंधित सेविका कामावरती रुजू झाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची योग्य ती दक्षता घेतली आहे.
पर्यवेक्षिका , छाया अमरजीत मसराम