महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मंकीपॉक्सवरील लसीला ‘डब्ल्यूएचओ’ची मंजुरी

06:32 AM Sep 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी 82 टक्क्यांपर्यंत प्रभावी

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

Advertisement

सध्या जगातील अनेक देशांमध्ये ‘एमपीओएक्स’ची म्हणजेच मंकीपॉक्सची प्रकरणे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आफ्रिकन देशांमध्ये मंकीपॉक्सचा संसर्ग झपाट्याने होत असून आता तो इतर देशांमध्ये पसरू लागला आहे. मंकीपॉक्सबाबत लोकांमध्ये चिंतेचे वातावरण असतानाच आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) मंकीपॉक्ससाठी पहिली ‘एमव्हीए-बीएन’ नामक लसीला मंजुरी दिली आहे. ही लस बवेरियन नॉर्डिक कंपनीने तयार केली आहे. ही लस घेतल्यास लोकांचा मंकीपॉक्स संसर्गापासून बचाव होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. वैद्यकीय चाचण्यांमध्ये ह्या लसीचे परिणाम 82 टक्क्यांपर्यंत प्रभावी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, ‘एमव्हीए-बीएन’ ही लस 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दिली जाऊ शकते. मंकीपॉक्सचा संसर्ग टाळण्यासाठी या लसीचे 2 डोस दिले जातील. हे दोन डोस 4 आठवड्यांच्या अंतराने दिले जाऊ शकतात. ही लस 2-8 अंश सेल्सिअस तापमानात 8 आठवड्यांसाठी साठवली जाऊ शकते. तथापि, जर ही लस मंकीपॉक्स झाल्यानंतर दिली गेली तर त्याचा परिणाम कमी होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, बवेरियन नॉर्डिक कंपनीच्या ‘एमव्हीए-बीएन’ ही लस पूर्व पात्रता यादीत समाविष्ट करण्यात आली आहे. या चाचणीनुसार औषधे आणि लसींची गुणवत्ता, सुरक्षितता आणि परिणामकारकता यांचे मूल्यांकन केले जाते. ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असून ती बाजारात  सुरक्षित लस उपलब्ध असल्याचे अधोरेखित करत असते. या लसीचे युरोपियन मेडिसिन एजन्सीद्वारे पुनरावलोकन केले गेले आहे. आता स्थानिक आणि जागतिक पातळीवर या लसीची उपलब्धता वाढवता येईल, असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article