For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

काही समस्या सोडविताना.....1

06:11 AM Mar 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
काही समस्या सोडविताना     1

‘मॅडम आत येऊ? हो..या..बसा ना..’

Advertisement

बसताक्षणी त्या दोघांनीही एकमेकांकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि नीलने वरच्या पट्टीतच सुऊवात केली. ‘प्रिया तू... तू त्याला जास्त लाडावून ठेवले आहेस म्हणून ही वेळ आली. फाजील लाड करायचेच नाही मुलांचे..

अरे व्वा! सगळं माझ्यावर ढकलून दे. तू वाटेल तशी खेळणी आणून देतोस तेव्हा..एकतरी खेळणं धड आहे का घरात. सगळ्याची नुसती मोडतोड. सगळे मलाच दोष देतात. मी सांगते का त्याला असं वागायला. सगळ्यांचं सगळं बरं चाललंय, मला मात्र कुठे जायचीही चोरी झालेय. अशापेक्षा मूल नसलेलं बरं..’

Advertisement

‘अरे...हो हो हो...काय चाललंय तुमचं? तुम्ही नीट सांगितलं तर मला कळेल ना?’

Advertisement

‘मॅडम..सॉरी.’ असं म्हणतच ती हुंदके देऊन रडू लागली. शांत झाल्यावर काही वेळाने ‘मॅडम असह्य झालंय हो. काही सुचत नाही. आता आमच्यातच भांडणं होऊ लागली आहेत. या आधी असं नव्हतं. अनय झाला आणि चित्रच बदललं.’ तिचं शेवटचं वाक्मय पूर्ण होतंय न होतंय तो धाडकन् दार उघडून अनय आत घुसला.. त्याला सांभाळणारी मुलगी धडपडतच आत आली. त्याने माझ्या टेबलवरच्या एक दोन वस्तू फटाफट उचलल्या आणि खाली टाकल्या.

टेबलवरचे स्टॉप वॉच हाताने गरगर उलटे सुलटे फिरवू लागला. मी पटकन् तिथले पेपरवेट उचलले आणि ड्रॉवरमध्ये ठेवले. टेबलवरच्या बाकी वस्तू उचलेपर्यंत अनयने हातात पेन घेऊन त्याचे दोन तुकडेही केले. त्याची आई त्याला ओरडली तसा तो खुर्चीतून उतरला आणि धावू लागला. त्या मुलीने, ‘अनय आपण बाहेर जावूया आणि बसून व्हीडिओ गेम खेळूया’ असे म्हणत कसंबसं त्याला बाहेर नेलं. तेव्हा कुठे थोडा वेळ तो बाहेर थांबला.

पाच सहा मिनिटेच तो आतमध्ये होता परंतु तो काळ कमालीचा दमवणारा होता. खरंच याला सांभाळणं ही कसोटीच होती. मुलाच्या या अवस्थेबद्दल ते दोघेही एकमेकांना दोष देत होती. त्यांच्यातील वाद एवढे वाढले होते की नात्याचा प्रवास नाते तुटण्याच्या दिशेकडे वळला होता. हे असं का होत आहे या प्रŽासोबतच त्यांच्यातली वाढलेली भांडणे आणि तणाव ही समस्या घेऊन खरंतर ते माझ्याकडे आले होते.

अनयची ही अवस्था तुमच्यापैकी कुणा एकाच्या लाडामुळे नव्हे तर ती अवस्था म्हणजे त्याच्या मानसिक अव्यवस्थेची लक्षणे आहेत हे त्यांना समजावून सांगितले.

अनयच्या शाळेबाबत विचारणा केली असता, आई वडिल दोघांनीही, येणाऱ्या तक्रारीनी आम्ही थकलो आहोत हे सांगत अनय कसा खोड्या करतो, हातातली एखादी वस्तू कशी झटकन् फेकून मारतो, असंबद्ध बडबड अशा अनेक गोष्टी सांगितल्या. तो ज्यावेळी झोपेल त्यावेळी आणि तेवढीच स्वस्थता असते मॅडम! असं सांगत त्याची आई पुन्हा रडू लागली.

मला एडीएचडीचे प्रतिनिधित्व करणारी ही केस वाटली. याचे विस्तारित रूप Attाहूग्दह अग्म्गि्t प्ब्जम्tग्न्ग्tब् एदी् असे आहे. याचे निदान करणे तसे थोडे क्लिष्टच असते. कधी कधी फसव्या लक्षणांमुळेही गोंधळ होऊ शकतो. यासाठी ऊग्णात दिसून येणारी काही विशिष्ट लक्षणे आणि कालावधी हे निकष महत्त्वाचे ठरतात. इतर अनेक गोष्टीही विचारात घ्याव्या लागतात.

या केसमध्ये या विकाराविषयी पालकांना माहिती देणे गरजेचे होते. मुलाला औषधोपचार करणे गरजेचे होतेच, त्यासाठी त्यातील तज्ञ व्यक्तीचे सहाय्य घेणे आवश्यक असल्याचेही त्यांना सांगितले. शिवाय मानसोपचाराच्या सहाय्याने काय करता येणे शक्मय आहे याची सविस्तर माहिती दिली. तसेच या विकारामुळे उद्भवू शकणाऱ्या वर्तन समस्यांबद्दल, अभ्यासात येणाऱ्या संभाव्य अडचणींबद्दलही कल्पना दिली.

अलीकडच्या काळात अस्थिर आणि चंचल मुलांच्या समस्या वाढत आहेत. साधारणपणे वयाच्या चौथ्या पाचव्या वर्षापर्यंत सगळीच मुले थोडीफार चंचल, धावणारी, धडपडणारी असतात. वय वाढते तसे हे वागणे आपोआप कमी होते. काहींच्या बाबतीत मात्र ते कमी न होता वाढते आणि घरच्यांसाठी, शाळेसाठी त्रासदायक आणि आव्हानात्मक ठरते. मुलांची ही अशी वर्तणूक त्यांच्या आजाराचा भाग असू शकते याची अनेकांना कल्पनासुद्धा नसते. एडीएचडीशी मिळताजुळता विकार Aअ (Attाहूग्दह अग्म्गि्t एद्)ी . या विकाराने त्रस्त असलेल्या मुलांमध्ये अति चंचलता तेवढी आढळत नाही. बाकी सगळी लक्षणे एडीएचडीप्रमाणेच असतात. पूर्वी हे दोन विकार भिन्न असल्याचे मानले जाई परंतु आता या दोन्हीचा विचार एडीएचडी या एकाच संज्ञेअंतर्गत होतो. तरी उपचार मात्र लक्षणानुसारच ठरवावे लागतात.

एडीएचडी या विकाराची महत्त्वाची लक्षणे तीन गटांत विभागता येतात.

1.चित्ताच्या एकाग्रतेचा अभाव

2.अतिचंचलता व अस्थिरता

3.भावनावशता

म्हणजे भावनेच्या आहारी जाऊन परिणामांचा विचार न करता वागणे.. थोडक्यात लहरीपणा.

बहुतांश या विकाराने ग्रस्त मुलांमध्ये वरील तीनही लक्षणे पहायला मिळतात.

  1. एकाग्रता व अवधानाचा अभाव-

या विकाराने ग्रस्त मुले एकाच गोष्टीवर फार काळ चित्त एकवटू शकत नाहीत. हाती असलेल्या गोष्टीतील नावीन्य क्षणार्धात संपून पुन्हा ती नव्या गोष्टीकडे वळतात. यामुळे कोणत्याही गोष्टीतले बारकावे त्यांच्या नजरेच्या टप्प्यात येत नाहीत. नवीन गोष्ट शिकणे अवघड होऊन बसते. लेखन वाचन याची तीव्र नावड दिसते कारण तिथे नजर आणि चित्त एकाग्र करावे लागते. तिथे गडबड होते.

  1. अतिचंचलता व अस्थिरता-

यामुळे ही मुले सतत इकडून तिकडे धावणे, धडपडणे, सतत वळवळ करणे, हातापायांचा चाळा, कशालाही धडकणे, अखंड बडबड अशा गोष्टी करताना दिसतात. आवाक्मयात असलेल्या कोणत्याही गोष्टीजवळ ते खेळतात. त्यातील संभाव्य धोके त्यांच्या लक्षात येत नाहीत. त्यामुळे भाजणे, कापणे, पटकन् शॉक लागणे या गोष्टी होऊ नयेत म्हणून पालकांना फार जागऊक रहावे लागते. शांतपणा हा शब्दच पालकांना या मुलांच्याबाबतीत स्वप्नवत वाटावा अशी काहीशी स्थिती असते.

3.भावनावशता-

एडीएचडी ग्रस्त मुले जे मनात येईल तसे वागताना दिसतात. एखाद्या गोष्टीचा सारासार विचार, त्या गोष्टींचे मूल्यमापन करणे, उपलब्ध पर्यायांचा विचार करणे या गोष्टी या मुलांना जमत नसल्याने ही मुले अधिरपणे, अविचाराने वागताना दिसतात. झटकन भावनांचे प्रकटीकरण, कुठल्याही गोष्टीची वाट न पाहणे या गोष्टी या विकारग्रस्त मुलांमध्ये पहायला मिळतात.

अर्थात या वर्तन समस्येविषयी एकाच लेखामध्ये सर्व मांडणे शक्मय नाही. या विषयी अधिक जाणून घेऊया पुढच्या भागात..

 -अॅड. सुमेधा संजीव देसाई

Advertisement
Tags :
×

.