For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बसला बाजू देताना कार उलटली गटारीत

11:05 AM Jul 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
बसला बाजू देताना कार उलटली गटारीत
Advertisement

सुदैवाने मोठा अनर्थ टळला : कारचालक किरकोळ जखमी

Advertisement

वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक

कंग्राळी बुद्रुक-शाहूनगर मेन अरुंद रस्त्यावर परिवहन खात्याच्या बसला साईड देताना कार रस्त्याकडेच्या गटारीत पल्टी झाली. सुदैवाने कारचालक किरकोळ जखमी झाला. या आठवड्यातील अपघाताची सदर दुसरी घटना असून एखाद्या निष्पापाचा जीव गेल्यावरच रस्ता रुंदीकरणासंदर्भात ग्रा. पं.चे डोळे उघडणार की काय, अशा संतापजनक प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहेत. कंग्राळी बुद्रुक, शाहूनगर मेन रस्त्यावर मंगळवारी दु. 3 वा. वसंत गवळी यांच्या शेताजवळ सदर अपघाताची घटना घडली. वसंत गवळी यांच्या शेताजवळ परिवहन मंडळाची बस कंग्राळी गावाकडे येत होती. त्याच वेळेस के.ए. 22 एम. बी.- 2458 नंबरची स्वीफ्ट कार बेळगावकडे जात होती. परंतु अरुंद रस्त्यामुळे वसंत गवळी यांच्या शेताजवळ दोन्ही वाहने आल्यावर बसला साईड देण्यासाठी कारगाडी रस्त्याकडेला अगदी लागून घेत असतेवेळी कारगाडी गटारीत घसरली व गटारीमध्ये पलटी झाली. परंतु रस्त्यावरुन जाणाऱ्या नागरिकांनी कारचालक केशव कांबळे याला दरवाजा उघडून सुखरुप बाहेर काढले. केशव कांबळे यांना किरकोळ दुखापत झाली होती.

Advertisement

कलमेश्वर सोसायटी कर्मचारी व सिद्राय पाटील यांची कार्यतत्परता

वसंत गवळी यांच्या शेताजवळील अरुंद मेन रस्त्याकडेच्या गटारीमध्ये बसला साईड देतेवेळी कार पल्टी झाली. त्याचक्षणी कलमेश्वर सोसायटीचे कर्मचारीही कारगाडीच्या पाठीमागून येत होते. बघता-बघता कारगाडी गटारीमध्ये पल्टी झाली. तेव्हा लागलीच त्यांनी व सिद्राय पाटील या सर्वांनी कारगाडीमध्ये अडकून पडलेल्या कारचालक केशव कांबळे यांना सुखरुप बाहेर काढले. याबद्दल कारचालक केशव कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले.

शाहूनगर-कंग्राळी बुद्रुक रस्ता मृत्युचा सापळा

कंग्राळी बुद्रुक-शाहूनगर अरुंद रस्ता मृत्युचा सापळा बनला आहे. साई कॉलनी पुढे गावाकडे येणाऱ्या ठिकाणचा रस्ता तर अगदी जीवघेणा बनला आहे. पहिलाच अरुंद त्यातच खोल गटार दुचाकी, चारचाकी व अवजड वाहने जराशी बाजूला गेली तर वाहनधारकांना मृत्यूला सामोरे जावे लागणार आहे. परंतु शासनाचे इकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत

Advertisement
Tags :

.