महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

संसारात एकमेकांशी जुळवून घेताना....

06:15 AM Dec 06, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

माझ्या शेजारच्या काकू मला म्हणाल्या, ‘हल्ली भांडणे, संसार तुटणे फार होतं का गं?’ ‘का हो काय झालं-’ मी

Advertisement

‘अगं..माझ्या भावाची मुलगी सीमा. तू ओळखतेस ना तिला’. ‘हो. सीमा आणि साहिल. बरोबर ना?’

Advertisement

‘हो. तेच. लग्नाला जेमतेम तीन वर्षे झाली. दीड वर्षांची खूप गोड मुलगी आहे त्यांना! लग्न झाल्यापासून काही ना काही कुऊबरी सुऊच होत्या. एकदा सीमा माहेरी निघूनही आली होती परंतु रमाकांतनी(सीमाचे वडील) तिची समजूत घालून तिला परत पाठवले होते. पण आता सासरी जाणार नाही म्हणते. साहील चांगला मुलगा आहे गं. सोन्यासारखा संसार..काय बिनसलं यांचं काही कळत नाही.’

‘आमच्या वनीचीही मला खूप काळजी वाटते. तिचा स्वभावही तसा तापट आहे. सासरी कसं काय व्हायचं गं या पोरीचं? लग्न झालं. हुश्श..! असं करण्याइतकी आजच्या काळातली लगीनगाठ सोपी राहिली नाही ना गं!’ मी हसून म्हटलं. ‘हं खरं आहे काकू पण दोघांनीही जुळवून घेतलं, समजून घेतलं तर काही कठीण नाही.’

खरेतर वैवाहिक विसंवाद हा विषय आता अधिकाधिक समोर येऊ लागला आहे. पती पत्नीचे नाते इतर कुठल्याही नात्यापेक्षा भिन्न आहे. म्हणूनच या नात्यामध्ये तणाव उत्पन्न होण्याची शक्मयता अधिक असते. तसे पाहिले तर वैवाहिक विसंवादाला शेकडो कारणे असतात.

ङ             पती पत्नी यांच्यामधील सांस्कृतिक, शैक्षणिक, बौद्धिक पातळीमधे असलेले मोठ्ठे अंतर

ङ             स्वभाव, आवडीनिवडी अतिशय भिन्न, परस्परविरोधी असणे. स्वत:चेच म्हणणे खरे करायचा हट्ट.

ङ             स्वभावदोष, व्यक्तिमत्त्वातील कमतरता, कमकुवतपणा, विकृती

ङ             सासू-सून वाद, सासर-माहेर मतभेद

ङ             शारीरिक-मानसिक आजार, व्यसने

ङ             लैंगिक समस्या

ङ             आर्थिक बाबतीतील वाद, मुलांच्या संगोपनाविषयी मतभेद

ङ             विवाहबाह्य संबंध, चारित्र्याविषयी संशय

ङ             एकमेकांकडून केल्या जाणाऱ्या अवास्तव अपेक्षा

ङ             शारिरिक-मानसिक त्रास

अशा एक ना अनेक कारणांवरून पती-पत्नीमध्ये तंटे, खटके, भांडणे होत असतात.

अर्थार्जन, मुलांचे संगोपन, कामातील मदत, त्याचे वाटप किंवा वरील अनेक मुद्यांवरून जोडप्यात दुमत होऊ शकते परंतु आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळेही अनेक गोष्टी अशा आहेत ज्यांच्यामुळे या नात्यामध्ये दरी निर्माण होऊ शकते. कामाच्या अनियमित वेळा, पती-पत्नीचे कामांचे वेळापत्रक. म्हणजे काहीवेळा पत्नी घरी येते तर पतीची बाहेर पडायची वेळ झालेली असते किंवा याउलटही.. पगार भरपूर असतो. परंतु कामाच्या वेळा आणि कामाचा रगाडा यामुळे माणूस प्रचंड थकलेला असतो. अनेकदा दोघांमध्ये संवाद होत नाही. अनेकदा संवाद नाही हेच विसंवादाचे कारण ठरते. काही केसेसमधे असेही पहायला मिळते की लग्न कधी करायचे याबाबत मनात गोंधळ असतो. आपल्याला नेमके काय करायचे आहे, ध्येय काय याबाबत काही विचार नसतो. चला लग्न उरकून टाकू म्हणून लग्न केले जाते. अनेकदा नात्यांची फिल्मी समीकरणे डोक्मयात एवढी फिट्ट बसलेली असतात की ‘तो किंवा ती’ तसे वागले नाही तर पती-पत्नीचे एकमेकांवर प्रेमच नाही अशा समजुतीतूनही वादविवाद आणि नात्यामधे दरी निर्माण होते.

आजच्या बदलत्या काळानुसार या नात्यासमोर वेगवेगळी आव्हाने उभी आहेत. चला लग्न झालं.. हुश्श, सुटलो.. असं म्हणून चालणार नाही. कागदोपत्री नोंदणी झाली..चला काम झाले असे म्हणून चालणार नाही तर ते नाते भक्कम ठेवण्यासाठी पती पत्नी या दोघांनाही श्र्रम घ्यावे लागतील.

अनेकदा अशीही जोडपी भेटतात की ज्यांना लग्न होताक्षणी जोडीदाराने बदलायला हवे हा अट्टहास दिसतो. एकमेकांच्या सहवासात काही काळ गेल्यानंतर हळूहळू बदल होतो. हा बदल सावकाश होतो आणि तो बदल होण्यासाठी आधी जो फरक आहे त्याचा स्वीकार करण्याची मनोवृत्ती असायला हवी.

खरंतर असे कोणतेही नाते नाही की ज्यामधे मतभेद असणार नाही, वादळे येणार नाहीत. जोडप्यांमध्येही दुमत, मतभेद होणारच. कारण दोघांचे दृष्टिकोन, त्यांना मिळालेले वातावरण, संस्कार हे वेगवेगळे असतात. हे लक्षात घ्यायला हवे. तसेच एकमेकांशी बोलताना, संवाद साधताना काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात नाहीतर क्षुल्लक कारणांवरून होणारे मतभेद मनभेदापर्यंतचा प्रवास करताना दिसतात. उदा.

  1. आपले म्हणणे मांडताना दुसऱ्याला समजेल अशा भाषेत, स्पष्टपणे मांडायला हवे. निमा आणि महेश हे एक जोडपे आहे. पहा हं,. महेश ऑफिसमधून आल्यावर किती गरम होत आहे असे म्हणत खुर्चीत बसतो निमा पाणी आणून देते आणि गरम गरम चहा घेऊन येते. झालं..चहा बघताक्षणी महेशच्या कपाळावर आठ्या पडतात. थोडा आवाज वाढवतच..‘काय गं, इतकं गरम होतंय. चहा कशाला?’ निमा खट्टू होते. आता पहा.. अशा वाक्मयापेक्षा महेशने ‘निमा, आज खूपच उकडतय. चहाऐवजी आज सरबत कर’ असे म्हटले असते तर?
  2. महेशला ऑफिसमधून यायला उशीर झाला. येताक्षणी निमा, ‘काय हो वाजले किती बघा’. हा प्रŽ विचारून निमाला वेळ पहायची होती का? महेशने उत्तर दिले, ‘भिंतीवर आहे की घड्याळ..’ झालं, वाद सुरू.. पहा हं आता निमाच्या अशा प्रŽापेक्षा, ‘आज खूपच उशीर झाला. हरकत नाही. परंतु उशीर होणार असेल तर फोन करा. मला काळजी वाटते.’ अर्थात यातून महेशला निमाला वाटणारी काळजी समजेल.
  3. निमा महेशला म्हणते ‘अहो..त्या आपल्या शेजाऱ्यांनी नवी कोरी गाडी घेतली. तुमचे ज्युनिअर ना ते?’ याचा अर्थ आपण गाडी कधी घेणार असा होतो. परंतु तशी इच्छा व्यक्त करायची असेल तर मोकळेपणाने बोलावे.(शेजाऱ्यांनी घेतली म्हणून नव्हे) आपण गाडी कधी घेणार? असे तुलना न करताही विचारता येते.
  4. निमा छान साडी नेसून तयार होते. ‘सांगा ही साडी कशी आहे?’ या प्रश्नामध्ये अर्थातच तिला या साडीत मी कशी दिसते? माझी निवड कशी आहे हे ऐकायचे असते..महेश म्हणतो, ‘छॅ..हा कसला बकवास रंग..तुला अजिबातच शोभत नाही.’ पहा हं.. त्याऐवजी ‘निमा तुला निळा रंग फारच आवडतो ना. छान आहे. पण गुलाबी रंग अधिक खुलून दिसतो बघ.’ असं म्हणता येईल.

अर्थात तू तुला ऐवजी मला हे आवडतं हां असेही म्हणता येते. तू अमुक गोष्ट करत नाहीस, तुला हे जमतच नाही..घरात ढीगभर पसारा.. याऐवजी ‘मला ना घर अगदी नीटनेटकं आवडतं. ए, या रविवारी आपण सगळ्यांनी गप्पाटप्पा करत सारं आवऊया..ं हे अधिक चांगलं.

जोडप्यामध्ये संवाद असणे, संवाद होत असताना तो विसंवादाकडे वळणार नाही ना याची काळजी घेणे, न बोलताही एकमेकांचे मन वाचण्याचा आग्रह न धरणे यासारख्या काही गोष्टी सजग रहात केल्या तरी सहजीवनाचा प्रवास सुकर होण्यास मदत होईल हे मात्र निश्चित!

अॅड. सुमेधा संजीव देसाई

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article