For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

सर्वात बळकट वस्तुमान कोणते ?

06:54 AM Dec 25, 2023 IST | Tarun Bharat Portal
सर्वात बळकट वस्तुमान कोणते

जगातील सर्वात कठीण किंवा बळकट वस्तूमान (मॅटर किंवा मटेरियल) कोणते असा प्रश्न विचारल्यास आपल्यापैकी बहुतेकजण ‘हिरा’ असा उल्लेख करतील, निश्चित आहे. तथापि, ही समजूत तितकीशी योग्य नाही. कारण, ‘ग्राफिन’ हे साधन हिऱ्यापेक्षाही बळकट आणि कठीण असते. शिवाय ते अतियश हलके असते. ते पोलादापेक्षा 200 पट बळकट तर हिऱ्यापेक्षा 6 पट बळकट असते. ते एक अद्भुत वस्तूमान किंवा वंटर मटेरियल म्हणून ओळखले जाते.

Advertisement

ग्राफिनची निर्मिती पेन्सिल तयार करण्यासाठी उपयोग करण्यात येत असलेल्या ग्राफाईटचा उपयोग केला जातो. ही मऊ वस्तू असते. ग्राफिन हे ग्राफाईटप्रमाणेच कार्बनचे बनलेले असते. एक मिलीमीटर लांबीच्या ग्राफाईटमध्ये ग्राफिनचे 30 लाख कण असतात. ते वेगळे काढण्याची प्रक्रियाही अत्यंत जटील आणि कठीण आहे. ही वस्तू मधमाशांच्या पोळ्यांप्रमाणे षटकोनी आकारांच्या जाळ्यांमध्ये बांधली गेलेली असते. यातून वीजेचा प्रवाह सहजगत्या जाऊ शकतो. त्यामुळे याला सुपरकंडक्टर अशीही संज्ञा आहे. त्यामुळे त्याचा उपयोग इलेक्ट्रॉनिक साधनसामग्री निर्माण करण्यासाठी केला जातो. हा पदार्थ अपारदर्शी आहे आणि त्यातून केवळ 2 टक्के प्रकाश आरपार जाऊ शकतो. याची निर्मिती 2004 मध्ये आंद्रे गीम आणि कॉन्स्टंटाईन नोव्होसेलोव्ह या संशोधकांनी केली होती. हा शोध 21 शतकातील वैज्ञानिक चमत्कार मानला जातो, इतके या पदार्थाचे महत्व आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
×

.