मृत्यूनंतर शरीराने मरण्यास नकार दिला तर...
जाणून घ्या काय असते ‘थर्ड स्टेट’
आतापर्यंत माणूस किंवा एखादा जीव मृत्युमुखी पडल्यावर त्याची प्रत्येक पेशी देखील मरून जाते असे आपण समजत होतो. परंतु नव्या संशोधनाने सर्वांना चकित केले आहे. मृत्यूनंतरही काही पेशी जिवंत राहतात, स्वत:ला नवे रुप देतात, नवे जीवन सुरू करतात असे वैज्ञानिकांना आढळून आले आहे. वैज्ञानिकांनी याला ‘थर्ड स्टेट’ नाव दिले आहे, म्हणजेच ‘न पूर्णपणे जिवंत, न पूर्णपणे मृत’
बेडकाच्या मृत पेशींनी ‘जेनोबॉट’
अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी एका मृत बेडकाचा भ्रूण घेतला, त्याच्या त्वचेच्या पेशी मिळवत एका प्लेटमध्ये ठेवण्यात आल्या. या पेशी सडून जातील असे मानले जात होते. परंतु याच्या उलट घडले. पेशी परस्परांमध्ये जोडल्या गेल्या आणि छोटे छोटे जीवासारख्या झाल्या, त्यांना ‘जेनोबॉट’ असे नाव देण्यात आले आहे. या जेनोबॉट स्वत: चालू शकतात, घाव भरू शकतात. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे नव्या पेशींना एकत्र करत स्वत:सारखे आणखी जेनोबॉट तयार करतात, म्हणजेच मृत बेडकाच्या पेशी नव्या पिढी निर्माण करत होत्या.
मानवी फुफ्फुसांच्या पेशींची कमाल
आता हाच प्रयोग मानवी पेशींवर करण्यात आला. मृत मानवाच्या फुफ्फुसांमधील पेशी मिळविण्यात आल्या, प्रयोगशघ्ण्sत ठेवण्यात त्या ‘एंथ्रोबॉट’ नावाच्या गोळ्यात रुपांतरित झाल्या. हे गोळे पाण्यात तरंगू शकत होते. नजीकच्या हानीग्रस्त नसांना (नर्व सेल्स) ठीक करण्यास मदत करतात. खास बाब म्हणजे या पेशींमध्ये कुठलाच जेनेटिक बदल करण्यात आला नव्हता. केवळ योग्य वातावरण दिल्यावर त्यांनी स्वत: नवे रुप धारण केले.
मृत्यू आता पहिल्यासारखा राहिला नाही
टफ्ट्स युनिव्हर्सिटी रिसर्चच्या वैज्ञानिकांचे हे संशोधन नेचर नियतकालिकात प्रकाशित झाले आहे. शरीर भले मृत झाले तरीही त्याच्या काही पेशी अद्यापही ‘क्रिएटिव्ह’ राहतात, त्या नवे रुप मिळवू शकतात, नवे काम करू शकतात, म्हणजेच मृत्यूनंतरही जीवनाचा एक तुकडा शिल्लक राहतो असे वैज्ञानिक आता म्हणत आहेत. हे संशोधन रीजनरेटिव्ह मेडिसीनसाठी (नवा अवयव तयार करण्याचे औषध) अत्यंत आशादायक आहे. आगामी काळात डॉक्टर आजारांवर उपचार रुग्णाच्या मृत पेशींद्वारेच करू शकतील.
याचा लाभ काय होणार?
वैज्ञानिकांनुसार आगामी काळात हेच तंत्रज्ञान औषधांसाठी नवे जग खुले करणार आहे...
?रुग्णाच्या पेशी मिळवत छोटे रोबोट तयार केले जातील.
?हे रोबोट शरीरात जातील,कॅन्सरच्या गाठीवर औषध पोहोचवतील.
?नसांना जोडतील, नसांमध्ये जमलेली घाण साफ करतील.
?काम संपताच काही आठवड्यांनी स्वत:च विरघळून जातील, कुठलाच साइड इफेक्ट नाही.
?रुग्णाच्या स्वत:च्या पेशी असल्याने शरीर त्यांना रिजेक्ट करणार नाही.