सर्वात सुंदर महिलांचा देश कोणता ?
जगात असे काही देश आहेत, की ज्यांनी सुंदर महिलांचे देश म्हणून कीर्ती मिळविली आहे. युरोपातील एका संस्थेने यासंबंधीचे सर्वेक्षण केले असून त्याचा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. या सर्वेक्षणानुसार गेली दोन वर्षे जो देश रशियाशी युद्धात अडकला असून जर्जर झालेला आहे, त्या युक्रेन देशातील महिला सर्वात सुंदर आहेत. महिलांच्या सौंदर्याचे काही निकष या संस्थेने सर्वेक्षण करताना निर्धारित केलेले होते. त्वचेचा रंग, डोळ्यांचा आकार आणि रंग, महिलेची उंची, दातांची ठेवण आदी निकषांवर हे सर्वक्षण करण्यात आले होते. युव्रेनच्या खालोखाल स्वीडन या देशातील महिलांनी सौंदर्याच्या संदर्भात क्रमांक मिळविला आहे. त्यानंतर क्रमाने पोलंड, नॉर्वे, बेलारुस, तुर्किये आणि रशिया या देशांनी क्रमांक पटकाविले आहेत.
इस्रायलनेही या सूचीत वरचे स्थान पटकाविले आहे. मात्र, तेथील महिला या सूचीतील इतर देशांच्या मानाने हिंसक असतात असा निष्कर्ष या अहवालात काढण्यात आला आहे. बहुतेक इस्रायली महिलांना दोन वर्षे सैनिकी शिक्षण घ्यावे लागते. शस्त्रे हाताळावी लागतात. त्यामुळे नैसर्गिकरित्या त्या इतर महिलांच्या तुलनेत जास्त आक्रमक असतात, असे सर्वेक्षणकर्त्यांचे म्हणणे आहे. फ्रान्स आणि जर्मनीतील महिलांनी युरोपच्या सूचीत वरचा क्रमांक पटकाविला आहे. अर्थात, या सर्वेक्षणाला विरोधही केला जात आहे. कारण कोणाचेही सौंदर्य ही साक्षेक्ष संकल्पना असते. केवळ मोजके आणि विशिष्ट निकष लावून सौंदर्याची परिमाणे ठरविता येत नाहीत आणि गणनाही करता येत नाही. तथापि, महिलांच्या सौंदर्याचे जे जगन्मान्य निकष आहेत, तेच उपयोगात आणून हे सर्वेक्षण केल्याचे प्रतिपादन सर्वेक्षणकर्त्या संस्थेने केले आहे.