व्हाईट हाऊसमध्ये ‘ॐजय जगदीश हरे’ !
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन डी. सी.
अमेरिकेच्या अध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान असणाऱ्या ‘व्हाईट हाऊस’ मध्येही दीपावली उत्साहात साजरी करण्यात आली आहे. व्हाईट हाऊसमध्ये हा सण साजरा करण्याची प्रथा 21 वर्षांपूर्वी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज बुश (धाकटे) यांनी निर्माण केली होती. तेव्हापासून अमेरिकेच्या प्रत्येक अध्यक्षाने ही प्रथा पाळली आहे. अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष जोसेफ बायडेन यांची व्हाईट हाऊसमधील ही अखेरची दिवाळी आहे. कारण ते आता निवृत्त होणार आहेत. व्हाईट हाऊसमध्ये बायडेन दीपावली साजरी करत असताना तेथील बँडवर ‘ॐ जय जगदीश हरे’ या जुन्या आणि आजही लोकप्रिय असणाऱ्या हिंदी आणि हिंदू भजनाची धून वाजविण्यात येत होती. ही माहिती आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालक गीता गोपीनाथ यांनी ही माहिती ‘एक्स’ या समाजमाध्यमावर प्रसारित केली आहे. व्हाईट हाऊसच्या मिलिटरी बँडवर ही धून वाजताना ऐकून विशेष आनंद झाला, असे त्यांनी त्यांच्या प्रतिक्रियेत स्पष्ट केले आहे.