महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तो कुठे काय करतो...

06:32 AM Sep 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मॅडम...आत येऊ का? दाराबाहेरहून विचारणा झाली. काळेभोर आणि बोलके डोळे, सुरेख दंतपंक्ती, सतेज कांती, लांबसडक केस, उंच आणि मध्यमबांधा असलेली एक तरुणी उभी होती.

Advertisement

हो..या ना आतमध्ये.बसा..

Advertisement

ती खुर्चीत बसली खरी परंतु बसतानाही तिचा अस्वस्थपणा लक्षात येत होता, तिची देहबोली कमालीची अस्वस्थता सांगून जात होती.

बोला..

हं..मॅडम..मॅडम मी..मी सारं गमावुन बसलेय हो. समोर असताना कसली किंमत नसते..खूप अपेक्षा, गृहीत धरणं..वादावादी, भांडणं..पण आता कळतंय की मी चुकले खूप चुकले...पण आता काय उपयोग..असं म्हणत ती हमसुन हमसुन रडू लागली. सहा सात मिनिटे तशीच गेली. अशावेळी ती व्यक्ती शांत होण्याची वाट पहाणं एवढंच आपल्या हातात असते. मीही शांतपणे तेच केलं. ती थोडी शांत झाल्यावर पाण्याचा ग्लास पुढे करत म्हटलं. घ्या..थोडं बरं वाटेल.

मघाशी सुरेख दिसत असलेला चेहरा रडून पार बदलुन गेला. अगदी मलुल..आता तिच्या चेहऱ्यावर खूप ताण जाणवत होता.

थोडं सविस्तर सांगाल का? नेमकं काय झालं आहे?

हो मॅडम..सांगते. तिने बोलायला सुरुवात केली.

मॅडम..माझं नाव मिनल..मी नोकरी करते. आठ वर्षांपूर्वी माझं मानस सोबत लग्न झालं. अतिशय सरळ माणूस. कधी कुणाचा हेवा नाही, मत्सर नाही. आमचं अॅरेंज मॅरेजच. मला पाच वर्षांचा मुलगा आहे. तसं सुखी कुटुंब. घरात कशालाच कमी नाही. सारं काही सुरळीत सुरु होतं..आमच्यामध्ये तशी मीच चिडकी, पटकन् बोलणारी. पण तो सहन करायचा हो...असं म्हणत ती परत रडू लागली..सहन करायचा म्हणजे? मॅडम..मानसचा अपघात झाला. तो इतका विचित्र होता की उपचाराला संधीच मिळाली नाही तो..तो..गेला मॅम...मला सोडून कायमचा निघून गेला. मिनल परत हमसुन हमसुन रडू लागली. माझा हात तिने एवढा घट्ट पकडला होता की तिची वेदना, अस्वस्थपणा, निर्माण झालेली पोकळी हे सारं क्षणार्धात समोर आलं होतं. मिनल थोडी शांत झाल्यावर म्हटलं..खूप वाईट झालं. पण झालेली घटना स्विकारण्याखेरीज आपल्याकडे पर्याय नाहीये..हो ना? हो मॅम..

बघ हं..झालय हे खूप वाईट आहे परंतु यामध्ये एक गोष्ट बरी आहे ती म्हणजे सासु सासरे तुझ्याजवळ आहेत, समजून घेणारे आहेत, एक मुलगा आहे आणि तू स्वत: आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेस. बरोबर ना? हो मॅम. हे सर्व आहे म्हणून मी निदान उभी तरी आहे. हो. खरं आहे.

एवढ्या लहान वयात अशा पद्धतीने त्याचं तुझ्या आयुष्यातून निघून जाणं हे किती वेदनादायी आहे हे मी समजू शकते. परंतु मला सांग अशा काही गोष्टी आहेत का, ज्या तुला जास्त त्रास देतायत..हो मॅम...हो..खूप त्रास देतायत त्याच गोष्टी..तो गेलाय हे मी स्विकारंलय पण त्या त्रास देणाऱ्या गोष्टी आठवून माझी ही अवस्था होते आहे. ती पुन्हा रडू लागली.

मिनल..शांत हो. तू मोकळेपणाने बोललीस तरंच नेमकी समस्या मला समजून घेता येईल..हो ना? हं..म्हणत तिने हळूहळू स्वत:ला सावरलं आणि ती बोलू लागली.

मॅडम..मी नोकरी करणारी असल्याने घर-नोकरी हे करत असताना जशी सगळ्यांची धावपळ होते तशी माझीही व्हायची. तशी इतरांच्या तुलनेत कमीच..मुलगा लहान असला तरी मानसचे आईबाबा त्याला छान सांभाळणारे असल्याने ती काळजी नव्हती. शाळेत सोडणं, आणणं मानसच करायचा..तरीही मी चिडचिड करायचे. काय व्हायचं मला काय माहित. मी त्याला म्हणायचे, तुला काय कामं असतात रे? ठोकळ्यासारखाच तर बसतोस नुसता..घरी आलं की चहाचा कप हातात मिळतो, रिमोटने टीव्ही ऑन केला की झालं तुझं काम. ना पोळ्या लाटायला हव्यात, ना भाजी फोडणीला टाकायला हवी. वगैरे वगैरे..अनेकदा माझा राग त्याच्यावर निघायचा. तो बिचारा काहीच बोलायचा नाही. नुसता हसायचा. मी अजून चिडायचे काहीबाही बोलायचे. हक्कच गाजवायचे म्हणा ना. आता सारं आठवतय हो. तो निघून गेला आता सारं संपलं.

आता कळतंय मॅडम, तो काय काय करत होता ते..केवढा आधार होता त्याचा. त्याचं फक्त ‘असणं’ केवढं बळ देणारं होतं. वडील या नात्यानंतर काळजी घेणारा आणि आपण हट्ट करु शकतो असा नवराच तर असतो. केवढा मानसिक आधार असतो हे आता कळतंय हो. मी खूप गृहीत धरलं त्याला. पैशानेच सर्व नाही होत हे आता कळतंय मला. आर्थिक दृष्ट्या मी सक्षम आहे पण नवरा नावाचा एक अवयव नियतीने हिरावून घेतला हो माझा..मी दिव्यांग झाले. असं म्हणून ती पुन्हा ओक्साबोक्शी रडू लागली.

मिनलच्या मनाची घालमेल, तिला होणारं दु:ख, एक प्रकारचं आलेलं पोरकेपण सारं पुन्हा पुन्हा डोकं वर काढत होतं. मनात घट्ट रुतून बसलेल्या गोष्टी दूर करायला थोडा वेळ तर जाणारच होता. ती पत्नी या भूमिकेतच अडकलेली होती आणि ते स्वाभाविकच होतं. तिची आई, बहीण, मुलगी, सून हे सारे मी थोडे बाजूला सारले गेले होते. व्यापून होता तो फक्त पत्नी मी!! तिचे जगणे सुसह्य करण्यासाठी ‘मी चं गाठोडं’ हळूहळू उलगडणं गरजेचं होतं आणि त्या त्या भूमिकांकडे लक्ष वेधणं आवश्यक होतं. थोडा काळ मिनल येत राहिली. वेगवेगळ्या मानसोपचार तंत्रांचा उपयोग करत हळूहळू मिनल यातून नीट बाहेर पडली.

मित्रमैत्रिणींनो..स्त्राr असो वा पुरुष प्रत्येकाला भक्कम भावनात्मक आधाराची गरज असतेच. एक आदर्श नवरा बायको किंवा आदर्श जोडपं असं काही नसतं.

कुणालाही विचारुन पहा विवाहाच्या नात्यामध्ये मतभेद आलेच, तडजोड आली, काहीवेळा नकोच हे नातं असं वाटावं असे क्षणही आले आणि काहीवेळा आपला नवरा किंवा बायको हे जगातले सर्वोत्तम असावेत असे वाटणारेही क्षणही आले. खरंतर तुम्ही ‘मेड फॉर इच अदर पेक्षा’ ‘मोल्ड फॉर इच अदर’ कीती होताय यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. मी आणि तू चे ‘आपण’ कधी होणार हे या नात्यात ठामपणे सांगता येत नाही. पण तरीही हवहवसं असलेलं असं हे नातं असतं. मध्यरात्री आधारासाठी कुणाला हाक मारावी आणि समोरच्याने ओ द्यावी इतके आश्वासक नाते असते हे! स्त्राr आणि पुरुष ही या नात्याची, संसाराची दोन चाकं असतात. एक लक्षात घ्यायला हवे की कुणी कमी वा अधिक असे नसतेच मुळी!! परस्परांनी एकमेकाला समजून घ्यायला हवं. पत्नी म्हणजे सतत राबणारं यंत्र नव्हे आणि पती म्हणजे केवळ एटीएम् कार्ड नव्हे हे लक्षात घ्यायला हवे. आनंदाच्या क्षणांची साठवणूक करायला हवी आणि छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद, सुख शोधता यायला हवं. केवळ पती पत्नी या नात्यातच नव्हे पण आपण सगळेच एकमेकांना खूप गृहीत धरतो. एक लक्षात घ्यायला हवे की आपण कुणीच अमरत्वाचा पट्टा घेऊन इथे आलो नाही. जे आज आहे ते उद्या नाही हे होऊ शकतं. आपल्या हातात एकच गोष्ट आहे ती म्हणजे आहे तो क्षण कसा चांगला करता येईल याची काळजी घेणं!! ते करता आलं तर निदान अशी टोचणी मन ग्रासणार नाही.अर्थात..

एकाच लेखामध्ये हा विषय मांडणे अवघड आहे..अधिक जाणून घेऊया पुढच्या लेखात..

 -अॅड. सुमेधा संजिव देसाई

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article