For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुर्ल येथील उर्वरित रस्ता कधी पूर्ण होणार ?

01:24 PM Jun 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
सुर्ल येथील उर्वरित रस्ता कधी पूर्ण होणार
Advertisement

स्थानिकांचा सवाल : संबंधित खात्याने पुढाकार घेऊन रस्ता पूर्ण करण्याची मागणी

Advertisement

सांखळी : सुर्ल पंचायत क्षेत्रातील मडकईकर वाड्यावर जाण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता तयार केला. मात्र तो रस्ता अर्धवटच आहे. त्यामुळे उर्वरित रस्ता कधी होणार? असा सवाल स्थानिकांतून केला जात आहे. संबंधित खात्याने पुढाकार घेऊन हा उर्वरित रस्ता पूर्ण करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. उपलब्ध माहितीनुसार, 2021 साली भाजप सरकारच्या काळात सुर्ल मडकईकर वाड्यावर जणाऱ्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली होती. कोट्यावधी ऊपये खर्च करून बॉक्स पूल व दोन साकव बांधून या रस्त्याला चालना दिली. आतापर्यंत  ज्या वाड्यावर सायकल नेणे शक्य नव्हते, त्या ठिकाणी चारचाकी जाऊ लागली. लोक समाधानी झाले, मात्र उर्वरित रस्ता काही तांत्रिक कारणामुळे रखडला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी जमीन मालकांना विश्वासात घेऊन सदर रस्त्याचे काम हाती घ्यावे, अशी ही मागणी करण्यात आली आहे.

स्थानिकांमध्ये एकमत नसल्याने काम खोळंबले

Advertisement

मडकईकर वाड्यावर   आदीवासी समाजातील सुमारे 18 घरे असून धनगर समाजची तीन घरे आहेत. या स्थानिक लोकांमध्ये एकमत नसल्याने या रस्त्याच्या कामास विलंब झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लोकांनी एकत्र येऊन जमीन मालकांना विश्वासात घेऊन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सहकार्याने हे काम पूर्ण करावे, असे आवाहन स्थानिक युवा कार्यकर्त्यांकडून केले जात आहे.

Advertisement

.