महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ऊस वाहतुकीच्या ओव्हरलोड गाड्यांवर कारवाई कधी होणार?

11:12 AM Nov 19, 2023 IST | Kalyani Amanagi
Advertisement

आरटीओ, पोलिस प्रशासनाचे प्रचंड दुर्लक्ष; सोलापूर-हैद्राबाद, सोलापूर धुळे महामार्गावर वाहतुकीची वारंवार कोंडी

Advertisement

धाराशिव प्रतिनिधी

Advertisement

यंदा दिवाळी अगोदरच बहुतांश साखर कारखान्याची धुराडी पेटली आहे. त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यातच ओव्हलोडेड ट्रॅक्टर वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत असून, अपघाताचा धोका वाढला असल्याचे चित्र सोलापूर-धुळे व सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर दिसून येत आहे . ओव्हरलोड ऊस वाहतूक करून अपघातांना निमंत्रण देणार्‍या अशा वाहनांवर आरटीओ, पोलिस प्रशासनाकडून का कारवाई होत नाही? याबाबत जाणकार नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे.

क्षमतेपेक्षा जादा ऊस वाहतूक करणार्‍या वाहनांवर दंडात्मक कारवाई संबंधित साखर कारखान्यांनीही करणे गरजेचे आहे. त्यांनी अंकुश ठेवला तरच ओव्हरलोडला आळा बसणार आहे. ऊसतोड मजूर व चालक यांच्या संगनमताने ओव्हरलोडचे प्रकार घडतात. क्षमतेपेक्षा जादा वाहतूक केली तर वाहनाची मशिनरी खराब होते. याच बरोबर अपघात झाला त्यास जबाबदार कोणाला धरायचे? त्यामुळे त्यावर निर्बंध लावणे गरजेचे आहे. सध्या ऊस गाळप हंगाम धडाक्यात सुरू झाले असून, धाराशिव जिल्ह्यातील व परिसरातील साखर कारखान्याची धुराडी पेटली आहेत. उसाची वाहतूक करत असताना ट्रॅक्टर च्या पाठीमागे कधी एक तर कधी दोन ट्रॉली जोडले गेले असतात. ही ऊस वाहतूक करत असताना समोरून येणार्‍या गाडीला ट्रॅक्टर दिसते परंतु, त्या ट्रॅक्टर च्या पाठीमागे असलेल्या ट्रोलीवर कोणत्याही इंडिकेटर नसल्याने त्या दिसत नाहीत, बर्‍याचदा वाहनांच्या एकदम जवळ आल्यावर ट्रॉली दिसतात आणि मग घाईगडबडीत वाहन चालकाला होणारा अपघाताचे संकट टाळण्यासाठी धांदल उडते. ट्रॅक्टर च्या मागून येणार्‍या वाहनाचीही तीच अवस्था होते. ट्रॅक्टर च्या पाठीमागे असलेल्या ट्रॉलीवर इंडिकेटर नसल्याने बरेच अपघात घडत आहेत. ट्रक मध्ये क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरल्याने रस्त्यावरील विद्युत वाहिनी तुटल्यामुळे अनेक गावे अंधारात राहत आहेत. कधी उसाचे ट्रॅक्टर अचानक बंद पडल्याने मग तो ट्रॅक्टर रात्रभर रस्त्यावर व रस्त्याच्या कडेला थांबून ठेवला जात असल्याने त्यावरती नंबर, सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याहि उपाययोजना नसल्याने अंधारात ट्रॅक्टर रस्त्यावर असलेले दिसत नसल्यामुळे अनेक वाहने ट्रॅक्टर ला धडकून अपघात घडत आहेत. ट्रॅक्टरवर लावलेले टेपरेकॉर्डरचा आवाज मोठ्याने असल्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागतो. शिवाय ट्रॅक्टरच्या पाठीमागे काय घडते याचा अंदाज चालकाला येत नाही. रात्रीच्या वेळी उसाची वाहतूक बैलगाडीने सुरू असल्याने समोरून आणि मागून येणार्‍या वाहनांना बैलगाडीवर लाईट आणि इंडिकेटर नसल्याने बैलगाडी रस्त्यावर असल्याचे लवकर समजत नाही. अशा नियमबाह्य वाहतुकीने येणार्‍या काळात होणार्‍या अपघातापासून बचाव होण्यासाठी संबंधित प्रशासनाने असुरक्षित वाहतूक करणार्‍या वाहनासाठी नियमावली करीत त्याची काटेकोरपणे अमलबजाणी होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करणे गरजेचे आहे.

डब्बल ट्रॉली टॅक्टर व उसाचे ट्रक सुसाट

सध्या तालुक्यातील दोन व बाहेरील जवळपास सहा साखर कारखान्याचा गळीत हंगाम चालू आहे. तालुक्यातील विविध भागातील शेतातून ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असताना डब्बल ट्रॉली टॅक्टर व उसाचे ट्रक सुसाट धावत असल्याने नागरिकांना अपघातासह अनेक समस्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

 

Advertisement
Tags :
overloadtrucksseasonsugarcanetrackter
Next Article