कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भीतीला सामोरे जाताना...

06:42 AM Jun 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मॅडम नीला गर्दीच्या ठिकाणी जायचे म्हटले की बेचैन होते. तिथे पोहोचण्यापूर्वीच तिला अस्वस्थ वाटू लागते. तिला खूप समजावून सांगितले पण ती म्हणते मनात सतत खूप विचार येतात. बापरे, तिथे जाणेच नको असे वाटते. तिथे गेल्यावर जीव कासावीस होणार. गुदमरल्यासारखे होणार. हातापायात गोळे येणार असे विचार येतात. मग वाटते नकोच... त्यापेक्षा घरातच बसुया. तिथे जायचे नाही म्हटल्यावर ती एकदम रिलॅक्स होते. जादूची कांडी फिरावी तशी क्षणार्धात तिची भीती गायब होते. जोपर्यंत बाहेर जाण्याचा विषय निघत नाही तोपर्यंत मनात चलबिचल होत नाही. पुन्हा जायचे म्हटले की अस्वस्थता सुरू! ‘कळतंय पण वळत नाही’ अशीच काहीतरी तिची अवस्था झाली आहे.

Advertisement

नीलाच्या आईने वर्णन केलेली मुलीची अवस्था अगदी टिपिकल होती अर्थात प्रत्यक्ष भेट झाल्यावर त्या केसमधील तपशीलात काही फरकही दिसू शकतात किंवा काही वेगळ्या छटाही पाहायला मिळतात. परंतु, प्राथमिक भीती आणि भीतीचे थर वाढत जातात आणि भयप्रत गोष्टींची व्याप्ती वाढत जाते नंतर नुसत्या विचार व कल्पनेने ही भीती वाटू लागते ‘कळते पण वळत नाही’ अशी फोबिया ग्रस्त व्यक्तीची स्थिती असते. मागच्या एका लेखात उल्लेख केल्याप्रमाणे असे होते कारण आपल्या डोळ्यासमोर जे येते त्याची जागृत मनाला जाणीव होण्यासाठी 350 मिनी सेकंदांचा कालावधी लागतो मात्र डोळ्यातील रेटीनामध्ये तयार झालेली लहर मेंदूतील भीती निर्माण करणाऱ्या भागापर्यंत पोहोचण्यासाठी अवघ्या 50 मिनी सेकंदाचा कालावधी लागतो. म्हणजेच जागृत मनाला अर्थात बुद्धीला जाणीव व्हायच्या आतच 50 मिनी सेकंदामध्ये ती लहर आपल्या भावनिक मेंदूपर्यंत पोहोचलेली असते. त्यामुळे आपला भावनिक मेंदू त्वरित प्रतिक्रिया करतो. म्हणूनच बऱ्याचदा ‘कळायच्या आतच वळलेले असते’ अशी काहीशी स्थिती होते.

Advertisement

आपल्या मेंदूतील लिम्बिक सिस्टीम नावाचा भाग भावनांशी निगडित असतो त्यामध्ये aस्ब्gdaत्a नावाचा खूप महत्त्वाचा अवयव आहे जो कोणताही धोका जाणवला की लगेच प्रतिक्रिया करतो. उदाहरणार्थ ..समजा आपण रस्त्यावरून चालत आहोत. अचानक कुत्रा भुंकत अंगावर आला. धोका आहे हे कळताक्षणी हा भाग प्रतिक्रिया करतो शरीरातील अॅड्रीनलीन सारख्या अंर्तस्त्रावी ग्रंथी काही रसायने शरीरात सोडतात. शरीरात अनेक क्रिया घडतात ज्यामुळे आपण धोक्याला तोंड द्यायला किंवा पळायला सज्ज होतो. हे सारे काही सेकंदात घडते.

खरंतर निसर्गाने ही व्यवस्था स्वसंरक्षणासाठी केली आहे परंतु हाच aस्ब्gdaत्a अधिक सक्रिय झाला तर मग मात्र तो छोट्या छोट्या गोष्टींना प्रतिक्रिया करू लागतो. aस्ब्gdaत्a सक्रियता केवळ विचार करून बदलता येत नाही. ती जर कमी करायची असेल तर त्याला समजेल अशा भाषेत त्याच्याशी संवाद साधायला हवा. aस्ब्gdaत्a सतत शरीराशी जोडलेला असतो आणि शरीराच्या संवेदनांना तो प्रतिक्रिया करत असतो. म्हणजे त्याला फक्त संवेदनांची भाषा समजते. भीती कमी करण्यासाठी aस्ब्gdaत्a ची छोट्या छोट्या गोष्टींना होणारी तीव्र प्रतिक्रिया टाळायची असेल तर बॉडी स्कॅन हा माइंडफुलनेस चिकित्सेतील मेंदूचा व्यायाम महत्त्वाचा ठरतो. परंतु त्यापूर्वी माईंडफुलनेस चिकित्सेतील नैसर्गिक श्वसनासोबत होणारी छाती पोटाची हालचाल जाणणे, श्वास जाणणे, शांत बसून मनात येणारे विचार, भावना यांना चांगले अथवा वाईट असे लेबलिंग न करता त्याकडे साक्षी भावाने पाहणे याचा सरावही महत्त्वाचा आहे कारण आपला aस्ब्gdaत्a  संवेदना सतत जाणत असतोच पण त्या अनेकदा आपल्या जागृत मनाला जाणवत नसतात. श्वासाची हालचाल जाणणे आणि साक्षी ध्यान या व्यायामाच्या नियमित सरावाने या संवेदनाही आपल्याला लवकर जाणवू लागतात.

फोबियामध्ये बॉडी स्कॅन हे माईंडफुलनेसचे तंत्र अतिशय उपयुक्त ठरते. त्यासाठी खुर्चीत बसायचे किंवा जमिनीवरती मांडी घालून बसायचे आणि पुढील दहा मिनिटे मी शरीराची कोणतीही हालचाल करणार नाही. शरीर स्थिर ठेवणार आहे असे ठरवायचे. आता, डोक्यापासून पायापर्यंत शरीराची मनाने सफर करायची. कुठे वस्त्राचा स्पर्श, जमिनीचा स्पर्श जाणवतो आहे का किंवा कोणत्या अन्य संवेदना निर्माण होत आहेत का हे जाणायचे. शरीराच्या संवेदनात जाण्याच्या म्हणजे जणू काही मनाने शरीराच्या पेशींशी संवाद साधायचा. तिथे काय काय चालले आहे हे जाणायचे. कुठे दुखते आहे का? धडधडते आहे का? खाज सुटते आहे का? जळजळते आहे का? हे जाणायचे. तसे होत असेल तर ती स्थिती तशीच किती वेळ राहते आहे ती तशीच राहते आहे की बदलते आहे हे (चांगले आहे किंवा वाईट आहे असे लेबलिंग न करता) शांतपणे जाणत राहायचे. जेव्हा आपण प्रतिक्रिया करतो तेव्हा aस्ब्gdaत्a सक्रियता वाढवतो. याउलट यावेळी आपण कोणतीही प्रतिक्रिया न करता केवळ संवेदना जाणत राहतो त्यावेळी अशा स्थितीत(मेंदूचे परीक्षण केले असता) aस्ब्gdaत्a सक्रियता कमी झालेली आढळते.

फोबियामध्ये याचा खूप उपयोग होतो. भीतीमुळे शरीरामध्ये जी लक्षणे व संवेदना निर्माण होतात उदाहरणार्थ धडधड जाणवते, हातापायाला कंप सुटतो, पोटात गोळा येतो व अन्य काही नाव न देता येणाऱ्या संवेदना जाणवतात आणि भीती तीव्र होते. त्या संवेदनांना ‘बॉडी स्कॅनच्या’ नियमित सरावाने सामोरे जाणे जमू लागते. प्रतिक्रिया न केल्याने भीतीची तीव्रता कमी होते. शरीरात कोणतीही युद्ध स्थिती नाही हा मेसेज मेंदूपर्यंत पोहोचतो आणि शरीर मन शांतता स्थितीमध्ये येते. फोबियामध्ये माईंड फुलनेस चिकित्सेतील न्ग्sल्aत्ग्zatग्दह ‘अर्थात’ ‘कल्पना दर्शन’ ध्यानाचाही खूप उपयोग होतो. कल्पना दर्शन ध्यान म्हणजे त्या प्रसंगाची दृश्याची किंवा ज्या गोष्टीची भीती वाटते ती कल्पना करून पहायची, अनुभवायची. कल्पनेने आवाज ऐकायचा. स्पर्शाची कल्पना करायची.

पहा, आपण डोळे बंद केले आणि लिंबू अथवा चिंचेचे ध्यान केले तर नुसत्या कल्पनेने तोंडाला पाणी सुटते की नाही?

तसे फोबियामध्ये एखाद्या गोष्टीची किंवा ज्या गोष्टीची भीती असते तिच्या केवळ विचाराने वा कल्पनेने शरीरामध्ये युद्ध स्थिती निर्माण होत असते. ज्या गोष्टीची भीती आहे त्या गोष्टीला आधी कल्पना करून पाहणे हळूहळू त्याला स्पर्श अनुभवत तिथे जात आहोत अशी कल्पना करणे हे या तंत्रामध्ये टप्प्याटप्प्याने शिकवले जाते. जर शरीरात त्यावेळी काही संवेदना निर्माण झाल्या तर अगोदर करत असलेल्या बॉडी स्कॅन या तंत्राच्या नियमित सरावाने त्याला सामोरे जाणे हे रुग्णाला सहज जमू लागते. कल्पनेने टप्प्याटप्प्याने त्या फोबिक वस्तूच्या जवळ जाणे ते वातावरण अनुभवणे हे कल्पना दृश्याच्या माध्यमातून करता येते. नंतर प्रत्यक्षपणे त्या गोष्टीला सामोरे जाताना त्याचा खूप उपयोग होतो.

अर्थात, प्रत्येक फोबियामध्ये रुग्णाची स्थिती पाहून विविध उपचारांची दिशा ठरवावी लागते. परंतु योग्य उपचाराने फोबिया निश्चित बरा होतो. काही वेळा दु:ख कमी करून मन शांत करणारी औषध देणे, समुपदेशन, बिहेवियर उपचार पद्धती, कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरेपी या उपचार पद्धतींच्या माध्यमातून फोबिया निश्चित दूर करता येतो. परंतु रुग्णाची हेटाळणी न करता त्याला दिलासा देणे व समजून घेत योग्य उपचार घ्यायला प्रवृत्त करणे हे जरी आपण सजगतेने केले तरी फोबिया ग्रस्त व्यक्तीसाठी अनेक गोष्टी सोप्या होतील हे मात्र खरे!!

अॅड. सुमेधा संजीव देसाई

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article