For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गव्हाचे उत्पादन 3 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज

06:11 AM Apr 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
गव्हाचे उत्पादन 3 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज
Advertisement

चालू पीक विपणन वर्षासाठीचे संकेत : रोलर फ्लोर मिलर्स फेडरेशन ऑफ इंडियाचा अहवाल

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

1 एप्रिलपासून चालू पीक विपणन वर्ष 2024-25 मध्ये भारतातील गव्हाचे उत्पादन गेल्या वर्षीच्या 1,057.9 लाख टनांपेक्षा 3 टक्के अधिक असण्याची शक्यता आहे. रोलर फ्लोर मिलर्स फेडरेशन ऑफ इंडियाने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. देशातील 9 राज्यातील 84 जिह्यांमध्ये अॅग्रीवॉचने हे सर्वेक्षण केले आहे.

Advertisement

केंद्र सरकारने काढलेल्या अंदाजापेक्षा पीठ गिरणी कामगारांचा अंदाज वेगळा आहे. केंद्राच्या अंदाजानुसार, 2024-25 विपणन वर्षात गव्हाचे उत्पादन 1,120.4 लाख टन असू शकते, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 1.39 टक्के अधिक असेल. पीठ गिरणी कामगारांच्या सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, पिकाच्या एकूण पेरणीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 1 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर चांगले पीक आल्याने सरासरी उत्पादकता सुमारे 2 टक्क्यांनी वाढली असल्याची माहिती देण्यात आली आहे.  सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की महाराष्ट्र, राजस्थान आणि गुजरात या प्रमुख गहू उत्पादक राज्यांमध्ये क्षेत्र कमी झाले आहे, परंतु हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये अधिक क्षेत्र पेरले गेले आहे.

310 लाख टन खरेदी

भारताने 310 ते 320 लाख टन गहू खरेदीचे उद्दिष्ट ठेवले आहे, जे गेल्या वर्षीच्या 260 लाख टनपेक्षा अधिक असेल. गोदामांमधील साठा वाढवण्यासाठी अधिक खरेदी करणे आवश्यक आहे, गव्हाचा साठा अनेक वर्षांच्या नीचांकी पातळीवर आहे. सरकारकडून जास्त भाव न मिळाल्याने गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांनी खासगी खरेदीदारांना गहू विकला आहे.

Advertisement
Tags :

.