...ते देश काय चालवणार?
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा विरोधकांना खडा सवाल : गोव्यातील दोन्ही उमेदवार विजयी करण्याचे आवाहन
- देशात खरे परिवर्तन 2014 पासून : तानावडे
- धेंपे कुटुंबाचे ऋण फेडण्याची संधी : रवी
- गोंयकारपणाची भाषा करणारे खोटारडे : गावडे
- काँग्रेसचा जाहीरनामा ‘कट मोशन’ : सुदिन
- भाजपकाळात आमुलाग्र सुधारणा : शिरोडकर
- दोन्ही जागांवर कमळ फुलणार : दीपक
फोंडा : काँग्रेसच्या पन्नास वर्षांच्या राजवटीत देशाचा जो विकास होऊ शकला नाही, तो दहा वर्षांच्या कार्यकाळात मोदी सरकारने केला. मुक्तीनंतर गोव्याचा खऱ्या अर्थाने चौफेर विकास भाजपाच्याच राजवटीत झाला. ज्यांना स्वत:चा पक्षच निटपणे चालवता येत नाही, ते देश काय चालवणार आहेत. गोवा हे छोटे राज्य असले तरी विकासाच्या आघाडीवर काहीच कमी पडू देणार नाही, ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरेंटी आहे, भाजपाच्या दोन्ही उमेदवारांना मोठ्या मतांच्या आघाडीने विजयाची हमी देऊन दोन्ही जागांवर कमळ फुलवण्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी फोंडा तालुक्यातील प्रचार सभेत केले. भाजपाच्या दक्षिण गोव्यातील उमेदवार पल्लवी धेंपे यांच्या प्रचारार्थ भाजपा व मित्रपक्ष मगो यांची संयुक्त जाहीर सभा काल गुऊवारी येथील जुन्या बसस्थानकावर झाली. या सभेला संबोधीत करताना दक्षिण गोव्यात येणाऱ्या फोंडा, शिरोडा व मडकई मतदारसंघातून पल्लवी धेंपे यांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
पंतप्रधानपदाची हॅट्ट्रिक साधण्यासाठी
पल्लवी धेंपे यांना दिले जाणार मत हे मोदींजींना पंतप्रधानपदाची हॅट्ट्रिक साधण्यासाठीही असेल. मोदी सरकारच्या सर्व योजना देशातील महिला, युवा, शेतकरी व गरीबांना केंद्रस्थानी ठेऊन कार्यान्वित केलेल्या आहेत. अंत्योदय तत्त्वावर चालणारे हे सरकार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.
येत्या पाच वर्षांत आणखी महत्वाचे निर्णय
येणाऱ्या पाच वर्षांत समान नागरी कायदा, एक देश एक निवडणूक ही मोदी सरकारची हमी आहे. महिला आरक्षण विधेयकानंतर आदिवासी समाजाला येणाऱ्या 2027 च्या विधानसभेत राजकीय आरक्षणाची पुनरुक्तीही त्यांनी केली. यावेळी व्यासपीठावर उमेदवार पल्लवी धेंपे यांच्यासह भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सदानंद तानावडे, कृषीमंत्री रवी नाईक, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, क्रीडामंत्री गोविंद गावडे, मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर, माजी खासदार विनय तेंडुलकर, अॅङ नरेंद्र सावईकर, नगराध्यक्ष रितेश नाईक, फोंडा भाजपा मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ दळवी, डॉ. केतन भाटीकर, प्रदीप शेट, माजी सभापती अॅड. विश्वास सतरकर, अॅड. मनोहर आडपईकर तसेच नगरसेवक, तालुक्यातील जिल्हा पंचायत सदस्य, विविध पंचायतींचे सरपंच व पंचसदस्य उपस्थित होते.
देशात खरे परिवर्तन 2014 पासून : तानावडे
फोंडा मतदारसंघातून पल्लवी धेंपे यांना विक्रमी मतांची आघाडी तर मिळणारच आहे, शिवाय सालसेतमधूनही यावेळी मोठ्या मताधिक्क्याचा आकडा पार करणार असल्याचा विश्वास सदानंद तानावडे यांनी व्यक्त केला. देशात खरे परिवर्तन 2014 पासून मोदी सरकारच्या राजवटीत झाल्याचे ते म्हणाले. पल्लवी धेंपे यांनी फोंडा तालुक्यातील तीनही मतदारसंघातून मोठ्या मताधिक्क्याची खात्री व्यक्त केली. भाजपा सरकारच्या कार्यकाळात गोव्याचा चौफर विकास तर झालाच, शिवाय राज्याचे भवितव्यही उज्ज्वल असल्याचे त्यांनी नमूद केले.
धेंपे कुटुंबाचे ऋण फेडण्याची संधी : रवी
धेंपे कुटुंबाचे गोव्याच्या आर्थिक, शैक्षणिक, रोजगार अशा विविध क्षेत्रात विशेष योगदान असून त्यांचे हे ऋण फेडण्याची संधी म्हणून पल्लवी धेंपे यांना विजयी करण्याचे आवाहन मंत्री रवी नाईक यांनी केले.
काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे ‘कट मोशन’ : सुदिन
मंत्री सुदिन ढवळीकर यांनी काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे ‘कट मोशन’ असल्याची टीका केली. त्यात नवीन असे काहीच नाही. महामार्ग, पूल, विमानतळ या साधनुविधांसह विविध योजनांच्या माध्यमातून भाजपा सरकारने जनतेची संकल्पपूर्ती केलेली आहे. खाणबंदी, म्हादई, डबल टॅक या मुद्द्यावऊन भाजपावर आरोप करणारी काँग्रेसच त्याला जबाबदार असल्याचे ढवळीकर म्हणाले.
भाजप सत्ताकाळात आमुलाग्र सुधारणा : शिरोडकर
मंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले, भाजपा सरकारच्या कार्यकाळात शिक्षण, कृषी, पाणीपुरवठा या प्राथमिक सुविधांमध्ये आमुलाग्र सुधारणा झाली आहे. त्याची पोचपावती म्हणून प्रत्येक बुथवर पंच्याहत्तर टक्के मतदान पार करण्याचे उद्दिष्ठ्या गाठण्याचे आवाहन त्यांनी केले.
गोंयकारपणाची भाषा करणारे खोटारडे : गावडे
गोंय गोयंकारपणाची भाषा बोलणारे नाटकी व खोटारडे असल्याचा आरोप मंत्री गोविंद गावडे यांनी केला.
दोन्ही जागांवर कमळ फुलणार : ढवळीकर
फोंडा तालुक्यातून भाजपाच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी मगो पक्षाने पूर्ण ताकद लावली असून सन 2014 च्या निकालाची पुनरावृत्ती होऊन दोन्ही जागांवर कमळ फुलणार असल्याचा विश्वास दीपक ढवळीकर यांनी व्यक्त केला. विनय तेंडुलकर म्हणाले, भाजपा विकासावर बोलतो, विरोधक मात्र जनतेची दिशाभूल करणाऱ्या विखारी प्रचारात गुंतले आहेत. दक्षिण गोव्यातून महिला उमेदवाराला विजयी कऊन इतिहास घडविण्याचे आवाहन नरेंद्र सावईकर यांनी केले. आशिष सुद व डॉ. दयाशंकर यांचीही यावेळी भाषणे झाली. स्वागत विश्वनाथ दळवी यांनी तर शांताराम कोलवेकर यांनी आभार मानले.