महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पाश्चात्य विशेषाधिकार म्हणजे काय?

06:21 AM Nov 29, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारतातील प्रत्येकाला पाश्चिमात्य आणि युरोपीय संस्कृतींचे आकर्षण आहे. प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी परदेशात जाण्याची आणि पाश्चिमात्य माणसाप्रमाणे जगण्याची इच्छा असते. आणि तसे का वाटू नये? अमेरिका किंवा युरोपमध्ये नोकरीच्या संधी खूप आहेत असे म्हणतात. त्यांचे शिक्षण भारतातील शिक्षणापेक्षा विकसित आहे असेही म्हणतात. तेथे राहणाऱ्या प्रत्येकाचा गोरा रंग, त्यांचे महागडे कपडे, समृद्ध जीवनशैली खूप आकर्षक वाटते. त्यामुळे भारतात राहून भारताबाहेरच्या देशांबद्दल ओढ वाटणे अगदी साहजिक आहे.

Advertisement

पण जर यामध्ये काही चुकीचे असेल तर ते म्हणजे आपले वास्तव्याबद्दल असलेले अज्ञान. आपल्याकडे जे आहे त्याची आपण अनेकदा कदर करत नाही आणि इतर गोष्टींच्या मागे धावतो. हा मानवी स्वभावाचा खूप महत्त्वाचा पैलू आहे ज्याच्याबद्दल बारकाईने विचार केला पाहिजे. भारतातील मुलांना लहानपणापासूनच देशाबाहेर जाऊन अभ्यास करण्याचे स्वप्न दाखवले जाते. आपण गरीब देश आहोत हे विविध माध्यमातून आपल्या डोक्मयात बिंबवले जाते. भारत देश हा अजूनही विकास करत आहे आणि आपल्याकडे पाश्चात्य देशांइतकी संसाधने नाहीत हेही आपल्याला पटवून दिले जाते. हे सगळे कितपत खरे आहे हे माहिती नाही, पण भारताची जगासमोर ही प्रतिमा का झाली आहे याचा नक्कीच विचार करायला हवा.

Advertisement

आपण सत्य काय आहे याचा खोलवर जाऊन विचार केला पाहिजे. आपण भारतीय खरोखरच या सर्व गोष्टी आहोत का किंवा आपण इतरांपेक्षा कनिष्ठ आहोत असे वर्षानुवर्षे आपल्यावर बिंबवले गेले आहे. भारताचा इतिहास, सामाजिक रचना आणि राजकीय आचारविचार या सर्वांवर ब्रिटिशांच्या दडपशाही आणि वर्चस्वाचा खोलवर परिणाम झाला आहे. या पाश्चात्य राज्यकर्त्यांनी भारतीय जनतेवर प्रचंड अत्याचार केले. त्याऐवजी, त्यांनी भारताच्या संसाधनांचा फायदा घेतला, स्थानिकांचे जीवन कठीण केले आणि अनेक समस्या निर्माण केल्या. ब्रिटिश एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी भारतातील लोकांची विविध गटांमध्ये विभागणीही केली. त्यांना हे सुनिश्चित करायचे होते की भारतीय संघटित नाहीत, त्यामुळे ते त्यांच्यावर सहज राज्य करू शकतील. यामुळे, ज्या काळात आपण योग्य ते शिक्षण घेऊन, नवीन वैद्यकीय शोध लावून, पायाभूत सुविधा निर्माण करून विकासाकडे वाटचाल करायला हवी होती तेव्हा आपल्या पूर्वजांना त्यांच्याच देशातून आणि घरांमधून बेघर केले जात होते.

इंग्रजांचा असाही विश्वास होता की ते त्यांच्या त्वचेच्या रंगामुळे भारतीयांपेक्षा श्रेष्ठ आहेत. आपल्या मनामध्ये पिढ्या न पिढ्या हेच बिंबवले जात आल्यामुळे आपल्याला ते खरे वाटू लागले आहे आणि आपल्यावर जात, पात, रंग, धर्म आणि लिंग यावरून विभाजित करून राज्य केल्यामुळे आज आपण एकमेकांकडे मनात न्यूनगंड ठेवून वागतो.

पण या सगळ्यानंतर आज आपण विजयी झालो आहोत. खूप त्याग, प्रतिकार आणि इच्छाशक्तीच्या जोरावर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर आपण एक देश म्हणून आपल्या नागरिकांसाठी एक मजबूत लोकशाही राज्यघटना तयार करण्यासाठी कठोर परिश्र्रम घेतले आहेत. एक देश म्हणून आपण एक महासत्ता  म्हणून विकसित होण्यासाठी धडपडत असलो तरी ब्रिटिशांच्या या दडपशाहीने आपल्या मनावर आणि हृदयावर काही गंभीर डाग सोडले आहेत.

वसाहतवादामुळे लोकांमध्ये आत्मसन्मान आणि आत्मविश्वास कमी झाला, ज्यामुळे स्थानिक संस्कृती आणि परंपरांबद्दल न्यूनगंडाची भावना निर्माण झाली. इंग्रजी भाषा 121 भारतीय भाषांपेक्षा श्रेष्ठ बनली आहे. लोकांना इंग्रजी येत नसेल तर त्यांना कमीपणाची जाणीव करून दिली जाते, जरी हे लोक अनेक भारतीय भाषांमध्ये अस्खलित बोलत-लिहित असले तरीही. काळ्या गोऱ्यामध्ये फरक केला गेला. भारतीय सणांपेक्षा जास्ती पाश्चात्य सणांना जास्त महत्त्व दिले गेले. जेव्हा आपण भारतातील गरिबी आणि पायाभूत सुविधांच्या कमतरतेबद्दल तक्रार करतो तेव्हा आपल्याला हे लक्षात येत नाही की ब्रिटिशांनी भारतीयांचे सुमारे 45 ट्रिलियन डॉलर्स चोरले आहेत. जेव्हा ते ऐषोरामी जीवनाचा आनंद लुटत होते, तेव्हा आपण राखेतून आपला देश पुन्हा उभारण्याचा प्रयत्न करत होतो.

या सगळ्यानंतरही आपण खूप काही साध्य केले आहे. आपल्या संविधानाने आपल्याला जगातील सर्वात मोठ्या धर्मनिरपेक्ष, लोकशाही देशाची पदवी मिळवून दिली. आपण इस्रो नावाची आपली स्वत:ची अंतराळ संशोधन संस्था स्थापन केली आहे, ज्याने अंतराळ मोहिमांमध्ये प्रचंड यश मिळवले आहे. शिक्षण, क्रीडा, व्यवसाय आणि तंत्रज्ञान यामध्येदेखील आपण इतर देशांपेक्षा मागे नाही. आपले वैद्यकीय शिक्षण, उपचार आणि सुविधा जगातील सर्वश्रेष्ठ वैद्यकीय क्षेत्रांमधील एक आहे. आणि, भारतीय सैन्य हे जगातील दुसरे सर्वात मोठे सैन्य आहे.

एवढे सगळे असूनही, आपण स्वत:ला पाश्चात्य लोकांपेक्षा कमी का समजतो? आपल्याला असे का वाटते की भारताबाहेर योग्य ते शिक्षण आणि जीवनशैली मिळेल. होय, भारत अजूनही एक देश म्हणून विकसित होत आहे, परंतु आपण हे सर्व ओळखून भारताला पुढील महासत्ता बनवण्यासाठी या संसाधनांचा वापर का करू शकत नाही? आपली संस्कृती, इतिहास आणि जीवनशैली यावर विश्वास ठेवण्यासाठी आपल्याला पाश्चिमात्य देशांच्या मान्यतेवर अवलंबून राहण्याची गरज का आहे?

पाश्चिमात्य देश आपल्यापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहेत असे आपल्याला वाटत असताना, आपल्याला हे समजत नाही की आपण केवळ त्या चांगल्या गोष्टींकडे आकर्षित होतो ज्या त्यांना जगाला दाखवायला आवडतात. पाश्चिमात्य देशांमध्ये बेघर होण्याची मोठी समस्या आहे. भांडवलशाहीमुळे तेथे गरिबी ही मोठी समस्या आहे. त्याशिवाय, रंगावरून, धर्मावरून लोकांमध्ये दैनंदिन भेदभाव केला जातो. जरी त्यांच्याकडे औषधी क्षेत्रातील उच्च तंत्रज्ञान असले तरी मूलभूत वैद्यकीय सेवेचा खर्च अनेकांना परवडणारा नाही.

सांगायचा मुद्दा असा की दुसऱ्याकडे असलेल्या चांगल्या गोष्टींमुळे आपण आपल्यातील चांगल्या गोष्टींना कमी नाही समजले पाहिजे. समाजामध्ये पुन्हा एकदा आत्मविश्वास जागवला पाहिजे. एक भारतीय म्हणून आपण किती परिश्र्रमातून बाहेर पडून आज मजबूत लोकशाही उभी केली आहे याची जाणीव ठेवली पाहिजे आणि त्याला अजून विकसित करायचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याकडे जे आहे ते महासत्ता होण्यासाठी सध्या पुरेसे नाही. परंतु जर आपण या सर्व गोष्टी आपल्या देशासाठी वापरल्या तर भविष्यात आपल्याला अधिक विकसित आणि शक्तिशाली होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

-श्राव्या माधव कुलकर्णी

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article