रक्ताचे मूल्य किती ?
रक्त बव्हंशी सर्व सजीव प्राण्यांच्या शरिराचा अत्यंत महत्वाचा घटक असतो. रक्ताशिवाय असे प्राणी, ज्यांमध्ये मानवाचाही समावेश होतो, जिवंत राहूच शकत नाहीत. काहीवेळा अशी स्थिती येते, की मानवाला जिवंत ठेवण्यासाठी रक्त द्यावे लागते. म्हणूनच रक्तदान हे महादान समजले जाते. तसेच अशा दान केलेल्या रक्तचे मोल घ्यायचे नसते, असाही एक संकेत आहे. तथापि, काही प्राण्यांचे रक्त विकले जाते. त्याची किंमतही अफाट असते. तरीही ते खरेदी केले जाते.
हॉर्स शू क्रॅब नामक खेकड्याचे रक्त अन्य कोणत्याही प्राण्याच्या रक्तापेक्षा अधिक महाग असते. ते जगातील सर्वात महाग रक्त मानले जाते. ते निळ्या रंगाचे असते. त्यामुळे त्याला नीलसुवर्ण किंवा निळे सोने असे संबोधले जाते. या खेकड्याच्या 1 लीटर रक्ताचे मूल्य 15 हजार डॉलर्स, अर्थात साधारणत: 12 लाख रुपये असते. या किमतीत आपण एक कार विकत घेऊ शकतो. आता या रक्ताची किंमत इतकी का असते, असा प्रश्न आहे. तर, या रक्तामध्ये औषधी गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात, हे या प्रश्नाचे उत्तर आहे. या रक्तात लिमलस अमिबोसाईट लायसेट नामक एक प्रथिन विपुल प्रमाणात असते. या प्रथिनाचा उपयोग विविध प्रकारची औषधे निर्माण करण्यासाठी, तसेच या खेकड्यांचे रक्त काढण्याच्या प्रक्रियेनंतर साधारणत: 30 टक्के खेकडे मृत होतात. त्यामुळे त्यांचे रक्त काढून घेणे ही एक जटील प्रक्रिया असते. तसेच ती फार मोठ्या प्रमाणात करता येत नाही. तसे केल्यास हे खेकडे नामषेश होण्याची भीती आहे. त्यामुळे हे रक्त कमी प्रमाणात काढता येते. शिवाय त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात आहे. म्हणूनच त्याचे मूल्यही प्रचंड आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.