For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

म्हापसा बाजारपेठेत पोलिसांचे ध्वज संचालन कशासाठी?

01:04 PM Jun 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
म्हापसा बाजारपेठेत पोलिसांचे ध्वज संचालन कशासाठी
Advertisement

लोकांत उलटसुलट चर्चा : यापुढे रात्रीची गस्त मोहीम सुरूच राहणार : पोलीस अधीक्षक संदेश चोडणकर

Advertisement

म्हापसा : म्हापसा पोलिसांनी शनिवारी रात्री 10 वा. गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर ध्वज संचलन करून म्हापसा बाजारपेठ व सभोवताली परिसरात फेरफटका मारला. म्हापसा बाजारपेठेत काही ठराविक माध्यमांना याची कल्पना देऊन अचानक हे ध्वज संचलन करण्याचा उद्देश काय आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.दरम्यान म्हापशात हल्ली गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याबाबत शनिवारी सकाळी पोलीस अधीक्षकांना पत्रकारांनी छेडल्यामुळे की केवळ प्रसिद्धीसाठी ध्वज संचलन करून रात्रीची फेरी काढली काय? असा प्रश्न उपस्थित केला जात असून नागरिकांत उलटसुलट चर्चा सुरू आहे.

 यंदा गुन्हे कमी : उपअधीक्षक  

Advertisement

उपअधीक्षक संदेश चोडणकर यांना याबाबत छेडले असता, सध्या पोलीस रात्रीचे रस्त्यावर दिसत नाहीत, असा आरोप होत आहे. त्यामुळे पोलिसांनी ही रात्रीची मोहीम सुरू केली आहे. म्हापसा पोलीस हद्दीत गुन्ह्यांचे प्रमाण वाढले नाही.  गेल्यावर्षीच्या तुलनेत ते प्रमाण कमी आहे. यंदा 17 गुन्हे कमी आहेत. मात्र धरपकड जास्त आहे. त्यामुळे पत्रकांरांनी या गोष्टींचा अभ्यास करून प्रश्न उपस्थित करावे, असे चोडणकर म्हणाले. ही मोहीम यापुढे सुरूच राहणार,असेही त्यांनी स्पष्ट केले.

पोलीस उपअधीक्षक संदेश चोडणर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निखिल पालयेकर, पोलीस पथक म्हापसा बाजारपेठेत ध्वज संचलन करून फेरफटका मारला. फेरफटका मारताना बाजारपेठेत भिकारी, मद्यपी दुकानांसमोर झोपलेले आढळले. मात्र त्यांचे फोटो न घेण्याचे पोलिसांनी पत्रकांना बजावले. त्यामुळे पोलिसांनी हे ध्वज संचलन का केले, हे मात्र स्पष्ट केले नाही. सदर विशेष मोहिमे अंतर्गत दोघांना अटक करण्यात आली. तर 55 जणांना ताब्यात घेतले. 127 भाडेकरूंची पडताळणी केली. धुम्रपान प्रकरणी 6 तर उघड्यावर कचरा फेकणाऱ्या 13 जणांवर कारवाई केली, अशी माहिती यावेळी पोलिसांनी दिली. यापुढे रात्रीची गस्त चालूच राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Advertisement
Tags :

.