महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पँजिया अल्टिमा म्हणजे काय?

06:14 AM Nov 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पृथ्वीवर येणार मोठे संकट

Advertisement

पृथ्वी आता जशी दिसून येते, हजारो-लाखो वर्षांपूर्वी तशी नव्हती. म्हणजेच पृथ्वीवर असलेल्या गोष्टींचे स्वरुप वेळोवेळी बदलत राहते. पृथ्वी आता पुन्हा बदलाच्या दिशेने सरकत असल्याचे वैज्ञानिकांचे मानणे आहे. अखेर पृथ्वीवर नेमकं काय बदलणार हा प्रश्न उपस्थित होतो. याहून मोठा प्रश्न म्हणजे पृथ्वीच्या बदलाचा माणसांवरही प्रभाव पडणार का हा आहे.

Advertisement

वैज्ञानिक पृथ्वीच्या ज्या बदलाचा उल्लेख करत आहेत, तो बदल पृथ्वीवर विनाशही घडवुन आणू शकतो. अलिकडेच ब्रिस्टल युनिव्हर्सिटीचे एलेक्जेंडर फार्न्सवर्थ यांच्या नेतृत्वात नेचर जियोसायन्समध्ये भविष्यातील महाखंड आणि अन्य हवामान बदलांचा प्रभाव जाणून घेण्यासाठी संशोधन करण्यात आले आहे. या संशोधनात पृथ्वी पँजिया अल्टिमाला सामोरी जाणार असल्याचे आढळून आले आहे.

पँजिया अल्टिमा एक सिद्धांत असून जो भविष्यात पृथ्वीच्या महाखंडांना पुन्हा एकत्र येण्याच्या प्रक्रियेबद्दल माहिती देतो. ही एक काल्पनिक परिकल्पना असून जी विशेष स्वरुपात महाखंडीय विस्थापनाच्या सिद्धांतावर आधारित आहे. कोट्यावधी वर्षांपूर्वी पृथ्वीचे सर्व खंड एकत्र असायचे, परंतु कालौघात हे खंड परस्परांपासून वेगळे झाले आहेत.  पँजिया अल्टिमा थेअरीनुसार इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते आणि कोट्यावधी वर्षांनंतर पृथ्वीवरील खंड पुन्हा एकजूट होऊ शकतात.

तर काय घडणार...

ही थेअरी खरी ठरली तर पृथ्वीवर माणूस जिवंत राहणे  जवळपास अशक्य ठरणार आहे. पँजिया अल्टिमा थेअरीनुसार दोन खंड जेव्हा परस्परांना आदळतील, तेव्हा पूर्ण पृथ्वीवर मोठा भूकंप घडून  येईल, अशाप्रकारचा भूकंप पृथ्वीने पूर्वी कधीच अनुभवला नसेल. याचबरोबर समुद्रात निर्माण होणाऱ्या त्सुनामीमुळे सर्वकाही नष्ट होऊन जाईल. असे घडल्यास पृथ्वीवर अनेक ठिकाणी हिमालयासारखे उंच पर्वत निर्माण होतील, यामुळे पृथ्वीवरील वातावरण बदलून जाणार आहे. कदाचित या विध्वंसानंतरही काही माणसं जिवंत राहू शकतील.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article