For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हे चालले आहे तरी काय ?

06:42 AM Oct 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
हे चालले आहे तरी काय
Advertisement

अलिकडच्या काळात कोणी कसे वागावे, काय करावे आणि कसे करावे, याचा काही ताळतंत्र उरला नाही अशी स्थिती आहे. नाविन्य आणि आधुनिकतेच्या नावाखाली सारेच नितीनियम फाट्यावर मारले जात आहेत. याच संदर्भात सध्या डेबोरा पेक्सोटो नामक ब्राझीलच्या महिलेची चर्चा रंगली आहे. या महिलेने तिच्या वयाच्या दुप्पट वय असणाऱ्या, माणसाबरोबर विवाह केला. आता यात फारसे आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. कारण अलिकडच्या काळात असे विवाह अपवादात्मक प्रमाणात का असेना, पण होत असतात. ते नवीन राहिलेले नाहीत.

Advertisement

या महिलेचे तिच्या पतीशी लग्न झाले, तेव्हा तिचे वय 24 वर्षांचे होते. तर तिचा पती 54 वर्षांचा होता. त्यांनी सात वर्षे सुखाचा संसार केला. ही महिला आता 31 वर्षांची तर तिचा पती 61 वर्षांचा झाला होता. वयाच्या 31 व्या वर्षी ही महिला चक्क एका महिलेल्या प्रेमात पडली. तिला आपल्या पतीलाही सोडायचे नव्हते आणि ती जिच्या प्रेमात पडली होती, त्या महिलेचाही संग दिला हवा होता. आता हे तिघेही एकाच घरात वास्तव्य करीत आहेत. म्हणजे डेबोरा पेक्सोटो या महिलेला आता एक पुरुष पती आणि एक महिला प्रेमिका या दोघांचाही सहवास एकाच वेळी लाभत आहे. तिच्या पतीचीही तिच्या या नव्या समलिंगी प्रेमप्रकरणाला मान्यता आहे. या तिघांनीही एकमेकांमध्ये संबंध कसे असावेत, याचा एक करार केला आहे. डेबोरा हिच्या पतीचे नाव अँडरसन असे असून त्याने डेबोरा आणि तिची प्रेमिका लुईझा मार्काटो यांच्याशी महिन्यातून प्रत्येकी 10 वेळा तरी संबंध ठेवले पाहिजेत, अशी अट या करारात आहे. अनेकांनी या अशा संबंधांना विरोध केला असून ते सार्वजनिक टीकेचा विषय बनले आहेत. पण याची त्यांना कोणतीही पर्वा नाही. आम्ही आमच्या मनाप्रमाणे करु अशी त्यांची भूमिका आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.