व्हिडिओ तयार करण्यामागे नेमकी कोणती शक्ती?
मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून शोध सुरू
प्रतिनिधी : मुख्यमंत्र्यांच्या विरोधात एक व्हिडिओ प्रसारित झाल्याने जो गोंधळ उडालेला आहे, त्यातून सुरू झालेल्या चौकशीमध्ये केवळ विरोधी पक्षातीलच नव्हे तर सत्ताधारी पक्षातील मंडळीदेखील अडकण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने सदर व्हिडिओ दक्षिण गोव्याच्या कोणत्या भागातून आलेला आहे, याची चौकशी सुरू झाली आहे. व्हिडिओ तयार करण्यामागे नेमकी कोणती शक्ती आहे, याचाही शोध मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने सुरू केलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर पोलीस यंत्रणेने देखील गंभीरपणे चौकशीस सुऊवात केलेली आहे. संपूर्ण देशभरात मुख्यमंत्र्यांची बदनामी करून पक्षाचीच बदनामी करण्याचा प्रयत्न कोणीतरी चालविला असावा आणि सदर व्यक्ती सत्ताधारी पक्षामध्येच बसलेली आहे की काय याचाही शोध घेणे सुरू केले आहे. ज्या व्यावसायिक पद्धतीने हे चित्रीकरण केलेले आहे ते पाहता ते तयार करण्यासाठी लागणारा खर्च कोणा राजकीय नेत्यांनीच उचलला की काय, याचाही शोध घेण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाने आग्रह धरला आहे.