कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Generic Medicines Benefits: जेनेरिक औषधे, फायदे आणि तोटे, काय सांगतात तज्ज्ञ

01:46 PM Aug 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जेनेरिक औषधे ब्रँडेड औषधांच्या तुलनेत कमी किमतीत असतात

Advertisement

By : डॉ. सचिन पाटील, हृदयरोगतज्ज्ञ

Advertisement

कोल्हापूर : जेनेरिक औषधे ही आधुनिक आरोग्यसेवा प्रणालीचा एक महत्त्वाचा भाग बनली आहेत. ही औषधे ब्रँडेड औषधांच्या तुलनेत कमी किमतीत असतात आणि त्याच सक्रिय घटकांचा समावेश असतो. देशात, जिथे आरोग्यसेवा खर्च हा सामान्यांसाठी मोठा प्रश्न आहे, तिथे जेनेरिक औषधांचे महत्त्व आणखी वाढते.

जेनेरिक औषधांचा अर्थ, त्यांचे फायदे, तोटे आणि त्यांच्याशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्यांची माहिती असणे आवश्यक आहे. जेनेरिक औषधे ही अशी औषधे असतात, जी ब्रँडेड औषधांचा पेटंट कालावधी संपल्यानंतर बाजारात आणली जातात. ही औषधे ब्रँडेड औषधांप्रमाणेच सक्रिय घटक (Active Pharmaceutical Ingredient ö API) असतात आणि त्याच रोगांवर उपचारासाठी वापरली जातात.

फरक इतकाच की, जेनेरिक औषधांचे नाव सामान्यत: त्यांच्या सक्रिय घटकाच्या नावाने असते आणि त्यांचे उत्पादन कमी खर्चात केले जाते. उदाहरणार्थ, पॅरासिटामॉल जेनेरिक औषध आहे, तर क्रोसिन हे त्याच औषधाचे ब्रँडेड नाव आहे. जेनेरिक औषधांचे नियमन भारतात ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स अॅक्ट, 1940 अंतर्गत केले जाते. जागतिक स्तरावर विश्व आरोग्य संघटना (WHO) आणि इतर नियामक संस्था जेनेरिक औषधांच्या गुणवत्तेची खात्री करतात.

जेनेरिक औषधांचे फायदे

कमी किंमत : जेनेरिक औषधांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यांची कमी किंमत. ब्रँडेड औषधांच्या तुलनेत जेनेरिक औषधे 30 ते 80 टक्क्यांपर्यंत स्वस्त असतात. त्यामुळे सामान्याला परवडणारी आरोग्यसेवा मिळण्यास मदत होते.

समान गुणवत्ता आणि परिणामकारकता : जेनेरिक औषधे ब्रँडेड औषधांप्रमाणेच सक्रिय घटक आणि परिणामकारकता राखतात. भारतात, जेनेरिक औषधांना मंजुरी देण्यापूर्वी त्यांची जैव-समतुल्यता (ँग्दल्ग्नि्aतहम) तपासली जाते. ज्यामुळे त्यांचा परिणाम ब्रँडेड औषधांइतकाच प्रभावी असतो.

उपलब्धता : जेनेरिक औषधे मोठ्या प्रमाणात उत्पादित केली जातात आणि त्यांची उपलब्धता ग्रामीण भागातही चांगली आहे. सरकारने जन औषधी केंद्रांतून जेनेरिक औषधांचा प्रसार केला आहे, ज्यामुळे ग्रामीण, शहरी भागातही ही औषधे सहज उपलब्ध होतात.

स्पर्धा आणि नवनिर्मिती : जेनेरिक औषधांच्या उत्पादनामुळे या उद्योगात स्पर्धा वाढते, ज्यामुळे ब्रँडेड औषधांच्या किमती कमी होण्यास मदत होते. जेनेरिक औषध कंपन्या नवीन औषध संयोजन किंवा वितरण पद्धती विकसित करण्यावरही लक्ष केंद्रित करतात.

आरोग्यसेवेचा विस्तार : कमी किमतीमुळे जेनेरिक औषधे सामान्यांना आणि कमी उत्पन्न असलेल्या गटांना उपचार घेण्यास सक्षम करतात. यामुळे समाजाच्या आरोग्य पातळीत सुधारणा होते.

जेनेरिक औषधांचे प्रमुख तोटे

गुणवत्तेबाबत शंका : जेनेरिक औषधांच्या गुणवत्तेबाबत सामान्यांमध्ये आणि काही वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये शंका असतात. कमी किमतीमुळे असा गैरसमज होतो की, ही औषधे ब्रँडेड औषधांइतकी प्रभावी नसतील. काही जेनेरिक औषधांची जैव-उपलब्धता (ँग्दन्aग्त्aंग्त्ग्tब्) ब्रँडेड औषधांपेक्षा थोडी वेगळी असू शकते, ज्यामुळे त्यांचा परिणाम कमी किंवा जास्त होण्याची शक्यता असते.

ब्रँडिंग आणि विश्वासाचा अभाव : ब्रँडेड औषधांचे मोठ्या प्रमाणात जाहिरात, मार्केटिंग केले जाते. ज्यामुळे रुग्ण आणि डॉक्टर त्यांच्यावर जास्त विश्वास ठेवतात. जेनेरिक औषधांना अशी जाहिरात नसते, त्यामुळे त्यांच्याबाबत विश्वास निर्माण होण्यास वेळ लागतो. अनेक रुग्णांना या औषधांचे नाव समजणे कठीण जाते, ज्यामुळे त्यांना ही औषधे कमी विश्वासार्ह वाटतात.

सहाय्यक घटकांचा फरक : जेनेरिक औषधांमध्ये सक्रिय घटक समान असले तरी सहाय्यक घटक (घ्हम्tग्न घ्ह्गाहे) जसे की बाइंडर, फिलर किंवा कोटिंग मटेरियल भिन्न असू शकतात. हे सहाय्यक घटक औषधाची स्थिरता, शोषण गती किंवा शरीरातील प्रतिक्रिया यावर परिणाम करू शकतात. काही रुग्णांना या सहाय्यक घटकांमुळे अॅलर्जी किंवा साईड इफेक्ट्स होण्याची शक्यता असते, जी ब्रँडेड औषधांमध्ये आढळत नाही. उदाहरणार्थ, काही जेनेरिक औषधांमधील रंग किंवा स्वाद देणारे पदार्थ रुग्णांना त्रास देऊ शकतात.

नियमन आणि अंमलबजावणीतील त्रुटी : भारतात ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स अॅक्ट, 1940 अंतर्गत औषधांचे नियमन केले जाते. तथापि, काहीवेळा अंमलबजावणीच्या पातळीवर त्रुटी आढळतात. त्यामुळे निकृष्ट दर्जाची किंवा बनावट जेनेरिक औषधे बाजारात येऊ शकतात. विशेषत: ग्रामीण भागात, बनावट औषधांचा धोका जास्त असतो, तिथे नियामक यंत्रणांचा प्रभाव मर्यादित असतो. त्यामुळे या औषधांवरचा विश्वास कमी होतो.

डॉक्टरांचा प्रतिसाद आणि प्राधान्य : अनेक डॉक्टर जेनेरिक औषधे लिहून देण्यास टाळाटाळ करतात. कारण त्यांना ब्रँडेड औषधांशी संबंधित अनुभव आणि विश्वास जास्त असतो. त्यामुळे रुग्णांना जेनेरिक औषधांचा लाभ मिळण्यास अडचण येते. पुरवठा साखळी आणि उपलब्धतेची समस्या : जन औषधी केंद्रांद्वारे जेनेरिक औषधांचा पुरवठा वाढवण्याचा प्रयत्न केला जात असला तरी, ग्रामीण भागात त्यांची उपलब्धता अजूनही मर्यादित आहे.

रुग्णांचा गैरसमज आणि माहितीचा अभाव जनसामान्यांना या औषधांबाबत पूर्ण माहिती नसते. अनेकांना, कमी किमतीची औषधे म्हणजे कमी दर्जाची औषधे, हा गैरसमज असतो. जेनेरिक औषधांचे नाव रासायनिक स्वरूपात असल्याने रुग्णांना ते समजणे कठीण जाते.

औषधांच्या परिणामात सुसंगततेचा अभाव : जेनेरिक औषधांचे उत्पादन वेगवेगळ्या कंपन्यांद्वारे केले जाते, प्रत्येक कंपनीची उत्पादन प्रक्रिया किंवा गुणवत्ता नियंत्रण पद्धती भिन्न असू शकते. यामुळे एकाच जेनेरिक औषधाचा परिणाम वेगवेगळ्या कंपन्यांच्या उत्पादनात वेगळा असू शकतो.

वापर वाढवण्यासाठी उपाय

जेनेरिक औषधांचा वापर वाढवण्यासाठी असलेली काही आव्हाने

Advertisement
Tags :
@KOLHAPUR_NEWS# Benefits#heart attack#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaGeneric medicinesheart specialist
Next Article