मिरजेत 19 कोटींची व्हेलमाशाची उलटी जप्त! शहर पोलिसांची कारवाई, तिघांना अटक
मिरज प्रतिनिधी
शहरातील शास्त्री चौक वांडरे कॉर्नर येथे कर्नाटकात तस्करीसाठी वाहतूक करण्यात येणारी व्हेलमाशाची उलटी (अंबरग्रिस) पकडण्यात पोलिसांना यश आले. तब्बल 19 कोटी रुपये इतकी या अंबग्रिसची किंमत आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिघा संशयीतांना अटक केल्याची माहिती पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी पत्रकारांना दिली.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये संशयीत मंगेश माधव शिरवडेकर (वय 36, रा. विश्वकर्मा हौसिंग सोसायटी, जवाहरनगर, कोल्हापूर), संतोष उर्फ विश्वास श्रीकृष्ण सागवेकर (वय 35, रा. वायरी, मालवण जि. सिंधुदूर्ग) आणि वैभव भालचंद्र खोबरेकर (वय 29, रा. कवटीकुडाळ, सध्या रा. देवबाग, मयेकरवाडी, जि. सिंधुदूर्ग) यांचा समावेश आहे.
पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी म्हणाले, शहरातील शास्त्राr चौक परिसरात वांडरे कॉर्नर ते फुले चौक कोल्हापूरकडे जाणाऱया रस्त्यावरुन काही इसम एका चारचाकीतून व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणार असल्याची माहिती शहर पोलिस आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानुसार पोलिस व वन विभागातील अधिकाऱयांच्या पथकाने सोमवारी रात्री अडीच वाजता तेथे सापळा लावला होता.
यावेळी संबंधीत संशयीत तिघेजण अल्ट्राज कारमधून व्हेलमाशाच्या उलटीची तस्करी करीत असल्याचे आढळून आले. तिघांपैकी एकजण मोपेड दुचाकीवर होता. पोलिसांना संशय आल्याने तिघांनाही थांबवून तपासणी केली असता कारमध्ये काळसर व पिवळसर रंगाच्या व्हेलमाशाच्या उलटीच्या चार लाद्या मिळून आल्या. त्याची किंमत 19 कोटी, 17 लाख, 20 हजार रुपये इतकी असल्याचे वनविभागातील अधिकाऱयांनी सांगितले. त्यानुसार पोलिसांनी सदर उलटीसह मोपेड दुचाकी आणि चारचाकी असा एकूण 19 कोटी, 24 लाख रुपयांचा मुद्देमाल जफ्त केला. तसेच तिघा संशयीतांना अटक करुन शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, व्हेलमाशाच्या उलटीला आंतरराष्ट्रीय बाजाता सोने व हिऱयांपेक्षाही दुफ्पट भाव आहे. यापूर्वीही पोलिसांनी सांगलीमध्ये अशा प्रकारची तस्करी उजेडात आली होती. आता सिंधुदूर्ग, कोल्हापूर, मिरज मार्गे कर्नाटकात व्हेलमाशाच्या उलटीची तस्करी होत असल्याचे दिसून आले. या तस्करीमध्ये काही स्थानिक तस्करही सहभागी आहेत का? याचा पोलिस तपास करीत आहेत. दरम्यान, जफ्त केलेले अंबरग्रिस वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.