कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इंग्लंड, आयर्लंड दौऱ्यासाठी विंडीजचा वनडे संघ जाहीर

06:42 AM May 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ सेंट जॉन्स, अँटिग्वा

Advertisement

वेस्ट इंडीज क्रिकेट संघ आयर्लंड व इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून यासाठी विंडीजने 15 सदस्यीय वनडे संघाची घोषणा करण्यात आली आहे. या महिन्याच्या उत्तरार्धात विंडीज या दौऱ्यासाठी प्रयाण करणार आहे.

Advertisement

या दोन्ही संघांविरुद्ध मिळून एकूण सहा वनडे सामने विंडीज संघ खेळेल. 2027 मध्ये आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धा होणार असून त्याच्या तयारीसाठी या मालिकांकडे पाहिले जात असल्याचे आयसीसीने सांगितले. धडाकेबाज फलंदाज शाय होपकडे या संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले असून आघाडी फळीत ब्रँडन किंग, एव्हिन लेविस, केसी कार्टी यांच्यासह युवा खेळाडू ज्युवेल अँड्य्रूचाही समावेश करण्यात आला आहे. अँड्य्रूने गेल्या वर्षी आयसीसी यू-19 वर्ल्ड कपमध्ये शानदार प्रदर्शन करीत चार सामन्यांत 207 धावा 69 च्या सरासरीने काढल्या. त्यात एक शतक व एका अर्धशतकाचा समावेश होता. या लक्षवेधी कामगिरीमुळे त्याला राष्ट्रीय वरिष्ठ संघात स्थान मिळाले आहे.

डावखुरा फलंदाज शिमरॉन हेटमायर आयपीएलमध्ये खेळत असल्याने त्याची या संघात निवड करण्यात आली नाही. विंडीज प्रशिक्षक डॅरेन सॅमी या दौऱ्यासाठी उत्सुक झाले असून इंग्लंड व बांगलादेशविरुद्ध मालिका जिंकून मिळविलेला जोम कायम ठेवण्याची त्यांची इच्छा आहे. 2027 मध्ये होणारी विश्वचषक स्पर्धा द.आफ्रिका, झिम्बाब्वे व नामिबिया येथे होणार आहे. आयर्लंडविरुद्धचे सामने 21, 23 व 25 मे रोजी तर इंग्लंडविरुद्धचे सामने 29 मे, 1 व 3 जून रोजी होतील.

विंडीज वनडे संघ : शाय होप (कर्णधार), ज्युवेल अँड्य्रू, केसी कार्टी, रॉस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, जस्टिन ग्रीव्ज, अमिर जंगू, अल्झारी जोसेफ, शमार जोसेफ, ब्रँडन किंग, एविन लेविस, गुडाकेश मोती, शेरफेन रुदरफोर्ड, जेडेन सील्स, रोमारिओ शेफर्ड.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article