For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वेस्ट इंडिजचा सामना आज युगांडाशी

06:26 AM Jun 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
वेस्ट इंडिजचा सामना आज युगांडाशी
Advertisement

वृत्तसंस्था/ जॉर्जटाउन (गयाना)

Advertisement

टी-20 विश्ववचषक स्पर्धेचे सहयजमान वेस्ट इंडिज आज रविवारी युगांडाचा सामना करताना त्यांच्या फलंदाजीतील बेपर्वाई झटकून टाकण्याचा प्रयत्न करतील. सुऊवातीच्या सामन्यात त्यांनी पापुआ न्यू गिनीवर पाच गडी राखून विजय मिळवलेला असला, तरी माफक 137 धावांचा पाठलाग करतानाही त्यांना त्यात धडपडावे लागले. याचे कारण कठीण खेळपट्टीवर संयमाची आवश्यकता असताना वेस्ट इंडिजचे फलंदाज बेपर्वाईने खेळत राहिले.

पापुआ न्यू गिनीवर विजय मिळविल्याने मनोबल वाढलेल्या युगांडाविऊद्ध वेस्ट इंडिजला विशेषत: फलंदाजीत थोडी सावधगिरी बाळगावी लागेल. निकोलस पूरन हा अलीकडच्या काळातील त्यांचा सर्वांत उत्कृष्ट फलंदाज असून या यष्टीरक्षक-फलंदाजावर शेवटपर्यंत क्रीझवर राहण्याची जबाबदारी असेल. युगांडाने या मैदानावर पापुआ न्यू गिनीला 77 धावांवर बाद केले होते. मात्र विजय मिळवण्याआधी लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांना संघर्ष करावा लागला होता,. त्यामुळे त्यांना फलंदाजी सुधारावी लागेल.

Advertisement

सामन्याची वेळ : सकाळी 6 वा. (भारतीय वेळेनुसार)

Advertisement
Tags :

.