महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

फातर्पा येथे विकसित भारत संकल्प यात्रेचे स्वागत

01:16 PM Jan 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बाबा जोरावर सिंग, बाबा फतेह सिंग यांच्या स्मृतींना अभिवादन, गुणवंत विद्यार्थ्यांसह विविध मान्यवरांचा सन्मान

Advertisement

कुंकळ्ळी : फातर्पा येथे विकसित भारत संकल्प यात्रेचे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बाबू कवळेकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून आणि समई प्रज्वलित करून स्वागत करण्यात आले. यावेळी देशासाठी शौर्य गाजविलेले बाबा जोरावर सिंग व बाबा फतेह सिंग यांच्या स्मृत्यर्थ बालदिवस पाळण्यात येऊन त्यांच्या तसबिरीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच शांतता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.  बाबा जोरावर सिंग व बाबा फतेह सिंग, यांचा शौर्याचा आपण नेहमी अभिमान बाळगला पाहिजे. त्यांचे बलिदान वाया जाऊ देता कामा नये. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करताना आम्ही सर्व जण देशसेवेसाठी एकजुटीने कार्यरत राहू अशी शपथ आजच्या क्षणी घेणे उचित ठरेल, असे कवळेकर यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने चौफेर प्रगती केली आहे. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहायला हवे. मोदींच्या कल्पनेतून आत्मनिर्भर भारत उपक्रम हाती घेण्यात आला असून त्याअंतर्गत केद्र व राज्य सरकारच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन तुमच्या दारी पोहोचले आहे. विविध योजनांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कवळेकर यानी केले. आत्मनिर्भर भारत उपक्रमांस लोकप्रतिनिधींना निमंत्रण असूनही ते जाणीवपूर्वक सहभागी होत नसल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला.

Advertisement

स्वयंपूर्ण मित्र उदय कुडाळकर, एसटी मोर्चा गोवा अध्यक्ष प्रभाकर गावकर, जिल्हा पंचायत सदस्य संजना वेळीप, भाजप मंडळाचे अध्यक्ष संजय वेळीप, फातर्पा पंचायतीच्या कार्यवाहू सरपंच मेदिनी नाईक, पंच शीतल नाईक, मारिया फर्नांडिस, अनीशा नाईक गावकर, जेनिफर फर्नांडिस, एजिमा रिबेलो व पंचायत सचिव संदेश वेळीप व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी पंचायत क्षेत्रातील अंगणवाड्यांसाठीच्या सुदृढ बालक स्पर्धेतील प्रथम तीन बक्षिसे भारत चंद्रकांत बागल, प्रेम भारत राम, अथर्व प्रथमेश सप्रे यांना कवळेकर यांच्या हस्ते देण्यात आली. याशिवाय खेळाडूंमध्ये राजदीप सुनील फातर्पेकर, डॉल्सी फर्नांडिस, मेलबर्न फर्नांडिस, तनिशा उदय नाईक, तियात्रिस्त मेव्हन फर्नांडिस, फातर्पा सरकारी हायस्कूलमधून शालान्त परीक्षेत विशेष श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या साक्षी दयानंद नाईक, पूर्वा शशिकांत गावकर यांचा गौरव करण्यात आला. तसेच केपेतील स्वयंसाहाय्य गटांच्या समन्वयक मीता फळदेसाई, स्वयंसाहाय्य गट विवोच्या प्रमुख स्मिता नाईक देसाई व निशा नाईक देसाई यांचाही कवळेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी फातर्पा सरकारी हायस्कूलच्या मुलींनी नृत्य सादर केले. श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण सभागृहात आयोजित या कार्यक्रमात एकूण 13 विविध सरकारी विभागांनी भाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंच शीतल नाईक यांनी केले व मनीषा नाईक देसाई यांनी आभार मानले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article