महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत

12:20 PM Jan 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सरत्या वर्षाला निरोप : ओल्ड मॅनच्या प्रतिकृतीचे दहन

Advertisement

बेळगाव : सरत्या वर्षाला निरोप देत नवी दिशा, नवी आशा आणि नवीन संकल्पासह बेळगावकरांनी नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला थर्टी फर्स्टचा आनंद लुटला. यंदा योगायोगाने विकेंड आणि ईयर एंड रविवारी एकाच दिवशी आल्याने बालचमूंसह साऱ्यांनीच थर्टी फर्स्ट जल्लोषात साजरा केला. रात्री 12 वाजता ओल्ड मॅन प्रतिकृतीचे दहन करून सरत्या वर्षाला निरोप दिला. शहर परिसरात न्यू ईयर धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने पार्ट्यांना रंग आला होता. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत जेवणावळी सुरू होत्या. रविवारी सुटी असल्याने सकाळपासूनच ओल्ड मॅन तयारी आणि पार्ट्यांचे नियोजन सुरू होते. विशेषत: शहराजवळील हॉटेल, रेस्टॉरंट फुल्ल झाले होते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध सवलत आणि पॅकेजही उपलब्ध करण्यात आले होते. विशेषत: तरुणांनी पार्ट्यांना प्राधान्य दिले होते. त्यामुळे शहराशेजारील शिवारात पार्ट्यांना पेव फुटले होते. रविवारी सुटी असल्याने सकाळपासून बालचमू ओल्ड मॅन तयारीत गुंतले होते. तर तरुणाई सकाळपासूनच लगबग सुरू होती.
Advertisement

मटण-चिकनच्या विक्रीत वाढ

31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर रविवारी शहर परिसरात मटण, चिकन, बांगडे आणि अंड्यांच्या मागणीत वाढ झाली होती. सकाळपासूनच मटण, चिकन खरेदीसाठी गर्दी झाली होती. शहरात मटण 700 रुपये किलो, चिकन 190 रुपये किलो, बांगडे 170 रुपये किलो तर अंडी शेकडा 600 रुपये व डझन 76 रुपये प्रमाणे विक्री झाली. विशेषत: मटणाच्या तुलनेत चिकनची विक्री अधिक प्रमाणात झाली. रविवार असल्याने घराघरातही मटणाचा बेत आखण्यात आला होता. त्यामुळे घरातील जेवणासाठी मटण तर पार्ट्यांसाठी चिकनची खरेदी अधिक प्रमाणात झाली.

हॉटेल, रेस्टॉरंट फुल्ल

31 डिसेंबरच्या रात्री शहर आणि शहराबाहेरील हॉटेल, धाबे आणि रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांची गर्दी वाढली होती. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत हॉटेल आणि रेस्टॉरंट फुल्ल होती. विशेषत: हॉटेलमध्ये मांसाहार जेवणाची रेलचेल पाहावयास मिळाली. त्यामुळे व्यावसायिकांनीही सुगी साजरी केली. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध थाली प्लेट आणि पॅकेजीसही ठेवण्यात आले होते.

घरोघरी मांसाहारचा बेत

पार्ट्यांबरोबर काही घरांमध्ये देखील मांसाहारचा बेत आखण्यात आला होता. कुटुंबासह 31 डिसेंबर घरातच काहींनी साजरा केला. रविवार असल्याने सकाळपासूनच मांसाहारी जेवणाची लगबग पाहावयास मिळाली. त्यामुळे शहरात घराघरातही थर्टी फर्स्ट साजरा झाला.

ओल्ड मॅनचे दहन

रविवारी रात्री 12 वाजता ओल्ड मॅनचे दहन करून सरत्या वर्षाला निरोप देण्यात आला. तर नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. शहरात विविध ठिकाणी ओल्डमॅनचे दहन झाले. विशेषत: कॅम्प परिसरात रात्री ओल्ड मॅन दहन करून तरुणाईंनी धुमधडाक्यात थर्टी फर्स्ट साजरा केला. शहराबरोबर उपनगरात आणि ग्रामीण भागात देखील रात्री ओल्ड मॅनच्या प्रतिकृतीचे दहन करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले.

तरुणाईची हुल्लडबाजी

31 डिसेंबरनिमित्त विविध ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले होते. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणांनी हुल्लडबाजी करून शांतता बिघडवली. विशेषत: वाहने सुसाट चालविणे, स्टंटबाजी करणे, कर्कश हॉर्न वाजविणे असे प्रकार पाहावयास मिळाले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article