वेलकम बॅक ऋषभ पंत
द.आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा : पंतकडे उपकर्णधारपदा: आकाशदीप, कुलदीपला संधी
वृत्तसंस्था/ मुंबई
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा करण्यात आली आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात ऋषभ पंतचे पुनरागमन झाले आहे. इंग्लंड दौऱ्यावरील दुखापतीतून सावरुन संघात परतल्यानंतर अपेक्षेप्रमाणे त्याच्याकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. उभय संघातील पहिली कसोटी 14 नोव्हेंबरपासून कोलकाता येथे खेळवण्यात येईल.
भारताचा टी 20 संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. अद्याप भारत आणि ऑस्ट्रलिया यांच्यात दोन टी 20 सामने अजून बाकी आहेत. हे दोन सामने झाले की भारतीय संघ मायदेशी परतणार आहे आणि त्यानंतर त्यांची दक्षिण आफ्रिकेच्या संघाबरोबर कसोटी मालिका होणार आहे. अर्थात, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी ही मालिका टीम इंडियासाठी महत्वाची आहे. दरम्यान, बुधवारी बीसीसीआयने या मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली.
गिलकडेच नेतृत्वाची धुरा, पंतलाही संधी
आफ्रिकेविरुद्ध मालिकेत शुभमन गिल पुन्हा एकदा टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. गिलने वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मालिकेत देखील संघाचे नेतृत्व करून मालिका जिंकली होती. आता, तो आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या मालिकेत कर्णधार म्हणून पुन्हा मैदानात उतरणार आहे. इंग्लंडविरुद्ध मालिकेदरम्यान दुखापत झाल्यामुळे पंत काही काळ मैदानाबाहेर होता. पण, आता तो पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून आफ्रिकेविरुद्ध मालिकेतून पुनरागमन करणार आहे. पंत संघात आल्यामुळे एन जगदीशन संघाबाहेर गेला आहे.विशेष म्हणजे, पंत आता फलंदाज, यष्टीरक्षक आणि उपकर्णधार अशा तिहेरी भूमिकेत मैदानावर दिसून येईल.
शमीकडे पुन्हा कानाडोळा
अलीकडेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीने सर्वांना प्रभावित करणाऱ्या मोहम्मद शमीला पुन्हा एकदा भारतीय संघात स्थान देण्यात आले नाही. संघ व्यवस्थापनाने आकाशदीप आणि मोहम्मद सिराजवर विश्वास व्यक्त केला आहे. शमीने रणजी ट्रॉफी सामन्यात लांब स्पेल टाकले आणि विकेट्स देखील चटकावल्या आहेत. पण, टीम इंडियात स्थान मात्र त्याला मिळवता आलेले नाही. दुसरीकडे, अनुभवी गोलंदाज बुमराह आणि सिराज हे नवीन चेंडू हातळतील. याशिवाय, कुलदीप यादवचीही संघात वर्णी लागली आहे.
भारतीय कसोटी संघ : शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रे•ाr, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, कुलदीप यादव.
कसोटी मालिकेचे वेळापत्रक -
पहिला सामना, 14 ते 18 नोव्हेंबर, कोलकाता
दुसरा सामना, 22 ते 26 नोव्हेंबर, गुवाहाटी