For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुरूंदवाडमध्ये वेटलिफ्टिंग टॅलेंट हंट चाचणी

05:54 PM Dec 29, 2024 IST | Radhika Patil
कुरूंदवाडमध्ये वेटलिफ्टिंग टॅलेंट हंट चाचणी
Weightlifting Talent Hunt Test in Kurundwad
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

कुरुंदवाड (ता. शिरोळ) येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यानजिकच्या सानेगुरुजी विद्यालयात 4 ते 5 जानेवारी 2025 या कालावधीत वेटलिफ्टिंग टॅलेन्ट हंट चाचणीचे आयोजन केले जात आहे. भारतीय वेटलिफ्टिंग असोशिएशन व भारतीय खेल प्राधिकरण (साई) आयोजित या चाचणी महाराष्ट्रातील फक्त 10 ते 14 या वयोगटातील मुला-मुलींना सहभागी होता येईल. सकाळी 8 ते सायंकाळी 6 अशी चाचणीचे वेळ नियोजित केली आहे.

चाचणीतून गुणवत्ताधारक मुला-मुलींची निवड करण्यासाठी खुद्द जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेती, ऑलिम्पिक मेडलिस्ट, पद्मश्री मिराबाई चानू, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक व द्रोणाचार्य पुरस्कार विजेते विजय शर्मा, आंतरराष्ट्रीय कोच अलकेश बरवा व सहायक कोच पाडियन आदींना निमंत्रित केले. या सर्वांकडून चाचणी दरम्यान मुला-मुलींना वेटलिफ्टिंग करण्यासाठी आवश्यक असलेल्या टिप्सही दिल्या जाणार आहेत. हे सर्वजण चाचणीतून क्षमता असलेल्या मुला-मुलींचा शोध घेऊन त्यांची साईच्या वेटलिफ्टिंग प्रशिक्षण केंद्रासाठी निवड करणार आहे. या केंद्रात मुला-मुलींना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तेव्हा महाराष्ट्रातील इच्छूक मुला-मुलींना चाचणीत सहभागी होण्यासाठी 4 रोजी सकाळी 8 वाजता उपस्थित रहावे असे आवाहन विश्वविजय वेटलिफ्टिंग जिमचे विश्वनाथ माळी यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.