महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

वेटलिफ्टर शेवुलीची शिबिरातून हकालपट्टी

06:46 AM Mar 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारा भारताचा पुरूष वेटलिफ्टर अचिंता शेवुलीची पॅरीस ऑलिंपिकसाठी येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय सराव शिबिरातून हकालपट्टी करण्यात आली आहे. मध्यरात्री महिलांच्या हॉस्टेलमध्ये प्रवेश करताना शेवुलीला रंगेहात पकडण्यात आल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली.

Advertisement

पतियाळातील एनआयएस महिलांच्या हॉस्टेलमध्ये मध्यरात्री वेटलिफ्टर अचिंता शेवुलीने प्रवेश करत असताना त्याला सुरक्षा अधिकाऱ्यांनी पकडले. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल करण्यात आला. भारतीय क्रीडा प्राधिकारण मंडळाचे तसेच पतियाळाच्या क्रीडा केंद्राचे प्रमुख संचालक विनीतकुमार यांनी या घटनेची गंभीर दखल घेत शेवुलीची या राष्ट्रीय सराव शिबिरातून हकालपट्टी केली. आगामी पॅरीस ऑलिंपिक स्पर्धेसाठी प्रवेशाची संधी शेवुलीने आता गमविली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#social media
Next Article