आठवड्याची सुरूवातच पाण्याच्या 'ठो' बाजाने !
कोल्हापूर :
दुरूस्ती आणि गळतीच्या नावाखाली कोल्हापूर शहरात मागील दोन महिन्यापासून दर सोमवारी आणि मंगळवारी पाणी पुरवठा बंद होत आहे. बालींगा, आणि नागदेववाडी या दोन उपशा केंद्रावरच शहरवाशीयांची तहाण अवलंबून आहे. शिंगणापूर उपशा केंद्र बंद असल्यानेच शहरातील पाणी पुरवठ्यावर ताण येत आहे. पाचशे कोटी रुपये खर्चून केलेली काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेवरील मर्यादायानिमित्ताने स्पष्ट होत आहे. दरम्यान, सोमवारी पाणी पुरवठा खंडीत झाल्याने शहवासीयांचे हाल झाले.
काळम्मावाडी योजनेवरील व्हॉल्व दुरुस्ती आणि अमृत योजनेअंतर्गत आपटेनगर पंपिंग स्टेशनवरील जलकुंभावर क्रॉस कनेक्शनचे कामामुळे सोमवारी (दि. 7) शहर, सलग्न उपनगरे आणि ग्रामीण भागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहिला. तसेच मंगळवारी ( दि. 8 ) पाणीपुरवठा अपुरा आणि कमी दाबाने होणार आहे. म्हणजे बुधवारी सकाळीच शहरात पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे. बालिंगा योजनेवर अवलंबून असण्राया सी आणि डी वॉर्डमधील नागरिकांचा पाणीपुरवठा फक्त सुरळीत होता. मात्र अर्ध्याहून अधिक शहरात पाणी-बाणी स्थिती होती.
ए, बी आणि ई वॉर्डातील अनेक परिसरांमध्ये पाणीपुरवठा प्रभावित झाले. फुलेवाडी रिंगरोड, गजानन कॉलनी, जयभवानी कॉलनी, अयोध्या कॉलनी, लक्ष्मीनारायण कॉलनी, मातंग वसाहत, बोंद्रेनगर, शिवशक्ती नगर, नाना पाटील नगर, संपूर्ण राधानगरी रोड परिसर, हरिओम नगर, मोहिते मळा, इंद्रप्रस्थ नगर, महालक्ष्मी पार्क, केदार पार्क आदी परिसरात सोमवारी पाणी आले नाही. काही ठिकाणी अत्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा झाला. ई वॉर्डातील राजारामपुरी परिसरात संपूर्ण राजारामपुरी, शाहू मिल, वैभव हौसिंग सोसायटी, ग्रीन पार्क, शांतीनिकेतन, रेव्हेन्यू कॉलनी, अरुणोदय, सम्राट नगर, उद्यमनगर, शास्त्राrनगर, पांजरपोळ, दत्तगल्ली, कामगार चाळ, महावीर नगर, अंबाई डिफेन्स भागात पाण्याचा तुटवडा जाणवला.
कावळानाका परिसरासह कसबा बावडा, लाईन बाजार, लोणार वसाहत, रुईकर कॉलनी, सदर बाजार, कदमवाडी, जाधववाडी, बापट कॅम्प, शिवाजी पार्क, ताराबाई पार्क, नागाळा पार्क, रमणमळा, शाहुपूरी व्यापारपेठ, व्हीनस कॉर्नर, साईक्स एक्स्टेन्शन, पाच बंगला आदी परिसरातील नागरिकांनाही पाण्याचा तुटवडा जाणवला. उद्या मंगळवारी (दि.8) अपुरा पाणी पुरवठा होणार आहे. तर बुधवारी सकाळी पाणी पुरवठा पूर्वीप्रमाणे होणार असल्याचे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने स्पष्ट केले.
दुरुस्तीचे काम सोमवारी दिवसभरात पूर्ण केल आहे. शहरवासीयांना दुरुस्तीच्या कामामुळे कमी दाबाने पाणी पुरवठा झाला. मंगळवारी काही भागात याचा परिणाम जाणवले. मात्र आता काम पूर्ण झाल्याने काही अडचण येणार नाही. हर्षजीत घाटगे (जलअभियंता, महापालिका)
बालींगा उपसा केंद्रातून रोज शहराला लागण्राया पाण्यापैकी अर्धे पाणी म्हणजे सरासरी 100 एमएलडी पाण्याचा उपशा केला जात होता. मात्र येथील उपशा यंत्रणा अध्यावत करण्याचे काम लालफितीचा कारभार आणि काहींच्या खाबूगिरीमुळे लांबणीवर पडले. महापूरासारखी अवस्था आल्यानंतर बालींगा उपसा यंत्रणा बंद पडते. याला सक्षम पर्याय थेट पाईपलाईन मानली जाते. मात्र पाईपलाईनही अध्याप पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा करत नसल्याचे वास्तव आहे. बालींगा उपशा केंद्र आणि थेट पाईपलाईन हे दोन्ही पर्याय सुरू ठेवण्याची गरज आहे.