महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कमकुवत खडकांमुळे बचावकार्यात धोका

06:28 AM Nov 28, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तज्ञांचा दावा : बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या सुटकेसाठी प्रयत्नांची पराकाष्टा

Advertisement

वृत्तसंस्था/ उत्तरकाशी

Advertisement

उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील सिलक्यारा येथे अडकलेल्या मजुरांना वाचवण्यासाठी रविवारपासून व्हर्टिकल म्हणजेच लंबरेषेतील खोदकामाला सुरूवात करण्यात आली. या उभ्या ड्रिलिंगद्वारे सुमारे 110 मीटरपर्यंत टेकडी खोदायची आहे. सोमवारपर्यंत मशिनने टेकडीमध्ये सुमारे 30 ते 35 मीटर खोदाई केली आहे. मात्र, प्रस्तावित बोगद्यामध्ये अनेक कमकुवत खडक व माती सापडू शकते. खोदाई सुरू असताना ही माती ढासळण्याचा धोका असल्यामुळे अतिशय सावधपणे काम केले जात आहे.

सिलक्यारा-बरकोट बोगदा प्रकल्प सुरू होण्यापूर्वी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाला सादर केलेल्या भूवैज्ञानिक अहवालात अनेक बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. या बाबींमध्ये ठिसूळ माती व दगडांचाही उल्लेख आहे. त्यामुळे आता व्हर्टिकल ड्रिलिंग करताना अतिशय सावधपणे पावले उचलली जात आहेत.डायव्हर्शन बोगद्याच्या बाजूने जाणारे 20 टक्के खडक चांगले आहेत, 50 टक्के चांगले असू शकतात, 15 टक्के खराब असू शकतात आणि 15 टक्के खूप कडक असतील, असा दावा भूपृष्ठीय भूगर्भशास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. तसेच अहवालानुसार या भागातील खडक कमकुवत गाळाचे आहेत. यामध्ये स्लेट, वेजेस आणि सिल्टस्टोनचा समावेश आहे. अशा परिस्थितीत खोदाईदरम्यान अनेक धोके उद्भवू शकतात.

बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना वाचवण्यासाठी बोगद्याच्या वरच्या बाजूने व्हर्टिकल खोदण्याचे काम दुपारपर्यंत 31 मीटरपर्यंत पोहोचले होते. हॉरिझॉन्टल ड्रिलिंग करणाऱ्या ऑगर मशिनमध्ये बिघाड झाल्यानंतर पर्यायी मार्ग तयार करण्यासाठी रविवारी बोगद्याच्या माथ्यावरून व्हर्टिकल ड्रिलिंग सुरू करण्यात आले. सिलक्यारा येथील बचावकार्याचे पर्यवेक्षण सीमा रस्ते संघटनेचे माजी महासंचालक हरपाल सिंग करत आहेत.

मॅन्युअल ड्रिलिंगद्वारे काढले ऑगर मशीनचे भाग

भुयारातील ड्रिलिंगदरम्यान ढिगाऱ्यात अडकलेल्या अमेरिकन ऑगर मशीनचे उर्वरित भाग सोमवारी पहाटे बाहेर काढण्यात आले. ढिगाऱ्यामध्ये ‘मॅन्युअल ड्रिलिंग’द्वारे पाईप टाकण्यासाठी प्रथम ऑगर मशीनचे सर्व भाग बाहेर काढणे आवश्यक होते. लष्कराच्या मदतीने हे काम पूर्ण करण्यात आले आहे. आता ‘मॅन्युअल ड्रिलिंग’ने आधीच बनवलेला मार्ग पुढे पूर्ण करण्यास सुऊवात झाली आहे. शुक्रवारी दुपारी 25 टन वजनाची ऑगर मशीन तुटली होती. यावेळी कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी फक्त 10-12 मीटर ड्रिल करणे बाकी होते. आता या मार्गानेही हळूहळू पुढे खोदाई केली जात असल्याचे नोडल अधिकारी नीरज खैरवाल यांनी सांगितले. सोमवारी पहाटे मशीनचे सर्व भाग ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article