For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मृणाल हेब्बाळकरांना सर्वाधिक मतदान करू

10:46 AM Apr 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
मृणाल हेब्बाळकरांना सर्वाधिक मतदान करू
Advertisement

रामदुर्ग येथे प्रचार सभा

Advertisement

बेळगाव : भाजपकडून कितीही गाजावाजा केला तरी रामदुर्ग विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांना सर्वाधिक मताधिक्य मिळणार आणि लोकसभा उमेदवार म्हणून निवडून येणार हे निश्चित आहे. मतदारसंघांमध्ये काँग्रेसला पूरक वातावरण निर्माण झाले आहे. असे आमदार अशोक पट्टण यांनी सांगितले. बेळगाव लोकसभा उमेदवार मृणाल हेब्बाळकरांचा रामदुर्ग विधानसभा मतदारसंघात प्रचार केला. हुलकुंद, बटकुर्की जि. पं. व्याप्तीतील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या प्रचार सभेमध्ये ते बोलत होते. रामदुर्ग विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवाराला वीस ते पंचवीस हजार मताधिक्य मिळवून देऊ. मृणाल मतदारसंघातील योग्य उमेदवार आहेत. त्यांना बहुमताने निवडून देण्यासाठी मतदारानी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. राज्य सरकारकडून गॅरंटी योजना राबवून आश्वासन पाळले आहे. यापुढेही जनसामान्यासाठी सरकार विकासाच्या योजना राबवू असे आवाहन आमदार अशोक पट्टण यांनी केले. यावेळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या भाजपचे उमेदवार केंद्रामध्ये मंत्री होण्याचे स्वप्न पाहत आहेत. मात्र यापूर्वी त्यांनी जिह्याचे मंत्री असताना कोणते योगदान दिले आहे. विकासाच्या योजना इतरत्र वळवून अन्याय केला आहे. अशा व्यक्तीला मतदान करणे योग्य आहे का? असा सवाल करून मृणाल यांना बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन केले. यावेळी काँग्रेस नेते प्रदीप पट्टण, राजू ताळीकोटे, राजेंद्र पाटील, काँग्रेस ब्लॉग अध्यक्ष सोमशेखर सिदलिंगप्पानवर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.