महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पारंपरिक मच्छिमारांच्या पाठीशी कायम उभे राहणार: आमदार वैभव नाईक

05:55 PM Oct 26, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

महाविकास आघाडी सरकार लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवणार : नाईक

Advertisement

आचरा प्रतिनिधी

Advertisement

विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे. निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता निश्चित येणार आहे. येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर एलईडी फिशिंग वरती कठोर कारवाई केली जाणार आहे. आताचे सरकार हे एलईडी फिशिंग करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम करत आहे. एलईडी फिशिंग करणारे या सरकारचे तसेच राणेंचे कार्यकर्ते आहेत. त्यांना हे पाठीशी घालत आहेत. निवडणूका आल्यावर राणे कुटुंबाला पारंपरिक मच्छिमार आठवतो. राणेंचे पारंपरिक मच्छिमारावर असणारे प्रेम फक्त निवडणुकी पुरते असल्याची टीका कुडाळ -मालवण मतदार संघांचे उबाठा गटाचे उमेदवार आमदार वैभव नाईक यांनी आचरा पिरावाडी येथे बैठकी दरम्यान केली.

आमदार वैभव नाईक आपल्या प्रचारासाठी आचरा येथे दाखल झाले होते. यावेळी त्यांनी आचरा येथील श्रीदेव रामेश्वराचे दर्शन घेत प्रचाराला सुरुवात केली. यावेळी आचरा येथील प्रचार कार्यालयाचे उदघाटन केले व आचरा पिरावाडी येथील मच्छिमार महिला बांधव यांच्या भेटी घेत संवाद साधला. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेनेत नुकतेच दाखल झालेले माजी आमदार परशुराम उपरकर,माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, जिल्हा प्रवक्ते मंदार केणी, मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर, विनायक परब, नारायण कुबल, समीर लब्दे, नितीन घाडी, अनुष्का गांवकर, पूर्वा तारी, माणिक राणे, अर्चन  पांगे, दिलीप कावले, राजू परब, राजू नार्वेकर, परेश तारी, जयदीप कुबल, मंदार खोबरेकर, उदय दुखंडे, आशु बांदिवडेकर, हर्षद पाटील, केदार परुळेकर, अनिल गांवकर,  समृद्धी आसोलकर, संजना रेडकर, सचिन रेडकर, श्रीकृष्ण वायंगणकर, तसेच शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महाविकास आघाडी सरकार लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवणार : नाईक

आताच्या सरकारवर महिलांचा विश्वास नाही. खात्यात जमा झालेली रक्कम परत कधी काढून घेतील याची गॅरंटी नाही. महाविकास आघाडी सरकार योजना बंद करणार अशा खोट्या अफ़वा पसरवल्या जात आहेत. मात्र महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर हीच रक्कम २ हजार करणार आहे . त्यामुळे आपण महिलांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन त्यांनी केले. आचरा व इतर परिसराशी आपला नेहमीच संपर्क राहिला. प्रत्येक व्यक्तीची कामे मी केलीत. विकासकामे केली. मात्र, हे राणे इकडे कधीच फिरकले नाहीत. विकासकामे कधी केली नाहीत. मात्र हा वैभव नाईक पारंपरिक मच्छिमारांच्या पाठीशी कायम उभा राहणार आहे. माझ्या सारख्या काम करणाऱ्या उमेदवाराला बळ देण्याची आता वेळ आली आहे . येणाऱ्या निवडणूकीत आपण सर्व ग्रामस्थांनी माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहावे असे आवाहन वैभव नाईक यांनी उपस्थित मच्छिमार बांधवाना केले .

नारायण राणेंना त्यावेळी शिवसेनेत आणले ही चुकच :उपरकर
आचरा येथील बैठकीत बोलताना जीजी उपरकर यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली. आचरा येथील राडा झाल्यावर शेकडो पारंपरिक मच्छिमारांकडे दुर्लक्ष करून पर्सनेटवाल्यांना आचऱ्यात येऊन भेटणारे नेते हे नारायण राणे होते. फयान वादळं झाल्यावर आपण शासनाकडे पाठपुरावा करून मच्छिमार बांधवांसाठी निधी मिळवला होता. तो परत मागे घालवण्याचे काम राणे यांनी केले. बाळासाहेब असताना नारायण राणे यांना आम्ही शिवसेनेत आणले ही आमची चुकच होती. वैभव नाईक यांच्यावर दहशतीचा आरोप करणाऱ्या राणेंनी जिल्ह्यात दहशत निर्माण केली. विकासासाठी काम करणाऱ्या वैभव नाईक यांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी मच्छिमार बांधवाना केले.

फोटो : परेश सावंत

Advertisement
Tags :
# tarun bharat news # news update # konkan update
Next Article