For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कथामाला मालवणचा सेवामयी शिक्षक पुरस्कार हनुमंत सुतार यांना जाहीर

05:28 PM Nov 24, 2024 IST | अनुजा कुडतरकर
कथामाला मालवणचा सेवामयी शिक्षक पुरस्कार  हनुमंत सुतार यांना जाहीर
Advertisement

आचरा प्रतिनिधी

Advertisement

अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण शाखेचा शिक्षण महर्षी कै. जी. टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार सन २०२५ श्री. हनुमंत तुकाराम सुतार, उपशिक्षक, जि. प. केंद्रशाळा खांंबाळे नं. १, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग यांना जाहीर झाला आहे. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, रोख रू. ५०००/- असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सदर पुरस्काराचे वितरण रविवार दि.५ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ठीक ३:३० वाजता शिक्षणतज्ज्ञ कै. जी. टी. गावकर विद्यानगरी द्वारा बा. ना बिडये केंद्रशाळा आचरे नं. १ येथे होणार आहे.

महाराष्ट्रातील थोर शिक्षणतज्ज्ञ आदरणीय जी. टी. गावकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रतिवर्षी कथामाला मालवण शाखा हा पुरस्कार वितरित करते. मान. श्री. रामचंद्र विष्णू आंगणे (उपशिक्षणाधिकारी) जि. प. सिंधुदुर्ग यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच कथामाला पदाधिकारी, कार्यकारणी सदस्य आणि शिक्षणप्रेमी यांच्या उपस्थितीत सदर सोहळा संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रमाला वेळीच उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. सदानंद मनोहर कांबळी, अध्यक्ष (निवड समिती जी. टी. गावकर पुरस्कार २०२५) यांनी केले आहे. हनुमंत तुकाराम सुतार यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपशिक्षक व पदवीधर शिक्षक म्हणून ३२ वर्षे सेवा केलेली आहे. विद्यामंदिर शिर, गुहागर, रत्नागिरी, विद्यामंदिर आचिर्णे, घाणेगढ वैभववाडी, विद्यामंदिर ब्राह्मण देव नवसादेवी नाधवडे, ता. वैभववाडी, विद्यामंदिर उंडिल नं. १, ता. देवगड, आदर्श शाळा गोवळ सोमळेवाडी ता. देवगड, विद्यामंदिर दिगशी नं.१ ता. वैभववाडी, जि. प. केंद्रशाळा खांबाळे नं. १ ता. वैभववाडी आदी शाळेत विविध शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवून शाळा समाजात जाण्यासाठी व समाज शाळेत येण्यासाठी विशेष प्रयत्न केलेले आहेत.

Advertisement

समाज संपर्कातून शैक्षणिक उठावातून शालेय भौतिक सुविधांची पूर्तता, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा, शिष्यवृत्ती स्पर्धा मार्गदर्शन, मंथन स्पर्धा मार्गदर्शन, विज्ञान प्रदर्शन, पथनाट्य, काव्य लेखन, कथामाला कार्यक्रम आदी उपक्रमातून शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. सध्या श्री. हनुमंत तुकाराम सुतार हे जि. प. केंद्रशाळा खांबाळे नं. १, तालुका वैभववाडी या शाळेत उपशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्या शाळेत साने गुरुजी कथामालेच्या माध्यमातून आपल्या मुख्याध्यापिका श्रीम. जयश्री नामदेव शेटये आणि सहकारी शिक्षक यांच्या सहकार्याने साने गुरुजी कथामालेचे कार्य करीत आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल सुरेश शामराव ठाकूर, अध्यक्ष साने गुरूजी कथामाला मालवण यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. श्री. हनुमंत सुतार यांच्या निवडीबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षणप्रेमींकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Advertisement
Tags :

.