For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आगामी विधानसभा निवडणूक ताकदीने लढू; भाजपच्या विचार मंथन बैठकीत निर्धार

07:19 PM Jun 22, 2024 IST | Abhijeet Khandekar
आगामी विधानसभा निवडणूक ताकदीने लढू  भाजपच्या विचार मंथन बैठकीत निर्धार
bjp
Advertisement

लोकसभा पराभवावर चिंतन : प्रदेशला अहवाल देणार : नेत्यांकडून नाराजी

Advertisement

सांगली प्रतिनिधी

लोकसभा निवडणूकीतील पराभव दुर्देवी आहे. पण, खचून न जाता झालेल्या चुका दुऊस्त कऊन आगामी विधानसभा ताकदीने लढूया असा निर्धार भाजपच्या विचार मंथन बैठकित करण्यात आला. दरम्यान, लोकसभा निवडणुकीतील पराभवाबाबत पक्ष निरीक्षक अतुलबाबा भोसले यांनी कोअर कमिटी सदस्य तसेच पदाधिकाऱ्यांशी स्वतंत्र चर्चा केली. त्याचा अहवाल प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणार आहे. दरम्यान बैठकीबाबत भाजपकडून गुप्तता पाळण्यात आली होती. बैठकीत खडाजंगी झाल्याची चर्चा आहे.
पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, खासदार तथा बूथ रचनेचे प्रमुख धनंजय महाडिक, आमदार सुधीर गाडगीळ, माजी खासदार संजयकाका पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशीकांत पाटील, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, माजी आमदार दिनकरतात्या पाटील, कार्यकारिणी सदस्य शेखर इनामदार, मकरंद देशपांडे, माजी आमदार नितीन शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, रवि तम्मणगौडा पाटील, अमरसिंह देशमुख, पृथ्वीराज पवार, मुन्ना कुरणे, धीरज सूर्यवंशी, विश्वजीत पाटील, अनिल पाटील, आजमभाई मकानदार, मोहन व्हनकंडे, अशरफ वांकर, यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकित लोकसभा निवडणुकीतील पराभवावर चर्चा झाली.

Advertisement

या अनुशंगाने पक्ष निरीक्षक अतुल भोसले यांनी प्रत्येक पदाधिकाऱ्यांशी स्वतंत्र चर्चा केली. त्यांची मते जाणून घेतली. त्याचा अहवाल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव दुर्देवी आहे. निवडणुकीत झालेल्या चुका दुऊस्त कऊया. आगामी विधानसभा निवडणुका ताकदीने लढू, असा निर्धार बैठकित करण्यात आला. दुपारी साडे बारा वाजता सुऊ झालेली बैठक सांयकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुऊ होती. बैठकीत विधानसभा मतदार संघनिहाय संघटनात्मक बांधणी, बूथ सक्षमीकरण, केंद्र व राज्य सरकारच्या योजना, पालकमंत्री, आमदारांच्या माध्यमातून झालेली विकासकामे आदी विषयावर चर्चा झाली.
पृथ्वीराज देशमुख आले अन् निघूनही गेले
बैठकितील चर्चा गोपनिय ठेवण्याचा प्रयत्न भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून सुऊ आहे. मात्र बैठकित लोकसभेतील पराभवावऊन तब्बल सात तास चिंतन करण्यात आले. पक्षाची संघटनात्मक बांधणी चांगली पण, काम झाले नाही, अशी नाराजी काही नेत्यांनी व्यक्त केली. जतमध्ये गोपिचंद पडळकर यांनी सुऊ केलेल्या राजकीय हालचालीवऊन रवि तम्मणगौडा यांनी थेट नाराजी व्यक्त केली. दरम्यान, माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख उशिरा आले. काही वेळ थांबत पुन्हा निघून गेले. त्यामुळे देशमुखांची नाराजी कायम असल्याची चर्चा सुऊ होती.
प्रत्येक पदाधिकाऱ्याशी स्वतंत्र चर्चा
पक्ष निरीक्षक अतुलबाबा भोसले यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाबाबत प्रत्येक पदाधिकाऱ्याशी स्वतंत्र चर्चा केली. त्याचा अहवाल ते प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना देणार आहेत. लोकसभा निवडणूतील झालेला पराभव वेदनादायी आहे. ज्या काही उणीवा राहिल्या असतील त्या दूर कऊन आगामी विधानसभा निवडणूक ताकदीने लढूया असा निर्धार बैठकित करण्यात आला. जोमाने कामाला लागण्याच्या सूचना भोसले यांनी दिल्या आहेत.
-प्रकाश ढंग, शहरजिल्हाध्यक्ष, भाजपा. सांगली.

Advertisement
Tags :

.